कोल्हापूर: शासनाच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील कर्मचारी कमलाकर पाटील (५२, रा. तात्यासाहेब मोहिते कॉलनी) यांचा रविवारी कोरोनाने बळी घेतला. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होेते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
फोटो: ०९०५२०२१-कोल-कमलाकर पाटील निधन
या नावाने फोटो मेल केला आहे.
कृषी अधिकारी नंदकुमार कदम यांचा कोरोनाने बळी
कोल्हापूर : गडहिंग्लजचे उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार कदम यांचा रविवारी कोरोनाने बळी घेतला. ते ५६ वयाचे होते.त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृतीही सुधारल्याने त्यांना सोमवारी डिस्चार्ज दिला जाणार होता, पण रविवारी रात्री त्यांना औषधांची ग्लानी आली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या ३५ वर्षांपासून राज्य शासनाच्या कृषी विभागात कृषी अधिकारी म्हणून जिल्ह्यासह तालुक्यातही काम केले. गेल्या तीन वर्षांपासून ते गडहिंग्लज येथे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून कार्यरत हाेते. विभागीय प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची उत्तम जाण असणारा अधिकारी अचानक कोरोनाला बळी पडल्याने कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारीही धक्क्यात आहेत.
फोटो नंदकुमार कदम निधन या नावाने मेल केला आहे.