(फोटो-०५०७२०२१-कोल-साताप्पा कांबळे निधन)
कोल्हापूर : रामानंदनगर, पवार कॉलनी येथील साताप्पा महादेव कांबळे (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पुतण्या असा परिवार आहे.
प्रियांका पाटील
(फोटो-०५०७२०२१-कोल- प्रियांका पाटील निधन)
कोल्हापूर : जवाहरनगर येथील दक्षिण महाराष्ट्रातील दलित साहित्य चळवळीतील सिद्धार्थ बुक सेंटर व प्रियदर्शी प्रकाशनचे प्रोप्रा. दिलीप आबाजी गवळी तसेच सक्षम वस्तीस्तर संस्थेच्या अध्यक्षा अनिता गवळी यांची ज्येष्ठ कन्या प्रियांका ऋतुराज पाटील (३१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, पती, कन्या असा परिवार आहे.
नितीन वाडेकर
(फोटो-०५०७२०२१-कोल-नितीन वाडेकर निधन)
काेल्हापूर : सन्मित्र हौसिंग सोसायटी, राजारामपुरी येथील नितीन रघुनाथ वाडेकर (वय ५१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
आनंदी पाटोळे
(फोटो-०५०७२०२१-कोल-आनंदी पाटोळे निधन)
काेल्हापूर : आंबेवाडी (ता. करवीर) येथील आनंदी वसंत पाटोळे (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
सदाशिव सावंत
(फोटो-०५०७२०२१-कोल-सदाशिव सावंत निधन)
कोल्हापूर : चिले कॉलनी येथील सदाशिव मारुती सावंत (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
अशोक कवाळे
(फोटो-०५०७२०२१-कोल-अशोक कवाळे निधन)
काेल्हापूर : राजारामपुरी चौथी गल्ली येथील अशोक विठ्ठल कवाळे (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले, मुली असा परिवार आहे.
दादु संकपाळ
(फोटो-०५०७२०२१-कोल-दादु संकपाळ निधन)
कोल्हापूर : शिंगणापूर, माळवाडी येथील दादू बाळू संकपाळ (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
बाबासाहेब कांबळे
(फोटो-०५०७२०२१-कोल-बाबासाहेब कांबळे निधन)
कोल्हापूर : चिंचवाड येथील बाबासाहेब आप्पाण्णा कांबळे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे.
ज्येष्ठ छायाचित्रकार शेखर वाली यांचे निधन (फोटो-०५०७२०२१-कोल-शेखर वाली निधन)
कोल्हापूर : येथील ज्येष्ठ छायाचित्रकार शेखर निजाप्पा वाली (वय ८१) यांचे निधन झाले. कोल्हापुरातील जुन्या काळात ते प्रतिभावंत छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. महाद्वार रोडवर येथे त्यांचा ‘रिगल फोटो स्टुडिओ’ होता. छायाचित्रात जिवंतपणा आणण्यासाठी ते नवनवे प्रयोग करत होते. गणेश विसर्जन मिरवणुकीचे अप्रतिम फोटो काढण्यात त्यांचा हातखंडा होता. उत्कृष्ट छायाचित्रांसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांनी विविध दैनिकांतूनही आपल्या छायाचित्रांची छाप पाडली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.