गडहिंग्लज : येथील वडरगे रोडनजीकच्या चिदंबरनगरातील हौसाबाई बाबूराव कुरळे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिवराज महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. वसंत कुरळे यांच्या त्या आई होत.
हौसाबाई कुरळे : १४०७२०२१-गड-०३
-----------------------
२) ज्येष्ठ सत्यशोधक कार्यकर्ते गणपती दळवी यांचे निधन
गडहिंग्लज : हेब्बाळ जलद्याळ (ता. गडहिंग्लज) येथील सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गणपती लक्ष्मण दळवी (वय ९८, सध्या रा. मोहितेनगर, गडहिंग्लज) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सुरुवातीला काही वर्षे त्यांनी मुंबई येथे गिरणी कामगार म्हणून काम केले. त्याठिकाणी त्यांनी 'नशापानविरोधी चळवळ' सुरू केली होती. त्यांनी स्थापन केलेल्या शुक्रकला लेझीम पथकाने १९७२ च्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकाविला होता.
ज्येष्ठ कम्युनिष्ट कार्यकर्ते कॉ. दशरथ दळवी यांचे ते वडील, तर कॉ. उज्वला दळवी यांचे ते सासरे होत. रक्षाविसर्जन, शुक्रवार (१६) सकाळी आहे.
गणपती दळवी : १४०७२०२१-गड-०४