कोल्हापूर कित्येक दिवसांनी पहिल्यांदा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची मृत्युसंख्या घटली आहे. नेहमी २५ हून अधिक असणारी ही संख्या बुधवारी १९ वर आली आहे. मात्र रुग्णसंख्या वाढतीच असून गेल्या २४ तासात १६९६ नवे कोरोनाचे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.
कोल्हापूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रापेक्षा करवीर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आढळली आहे. शहरामध्ये २४१ तर करवीर तालुक्यात ३०० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हातकणंगले तालुक्यात १९७ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील सर्वाधिक सात जण कोल्हापूर शहरातील आहेत. हातकणंगले तालुक्यातील चार तर करवीर तालुक्यातील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
चौकट
तालुकावर मृत्युसंख्या
कोल्हापूर ०७
कदमवाडी २, साने गुरुजी वसाहत, ताराबाई पार्क, कसबा बावडा, पायमल वसाहत, कोल्हापूर शहर
हातकणंगले ०४
पुलाची शिरोली, रेंदाळ २, चोकाक
करवीर ०३
शिंगणापूर, वडणगे, नंदगाव
शिरोळ ०१
भुदरगड ०२
शेणगाव, गारगोटी
इचलकरंजी ०१
इतर जिल्हा ०१
मांगनूर