कोल्हापूर : कोटीतीर्थ तलावात सोमवारी सकाळी कासव मृत होऊन पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आले. वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्र वनविभागाने मृत कासव ताब्यात घेऊन प्रयाग चिखली (ता.करवीर) येथील वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राकडे पाठविले.
मासेमारीच्या जाळ्यात अडकून फास लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. पाच दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे काही कासवे मृत अवस्थेत आढळून आली होती. तलावातील प्रदूषित पाणीही कारणीभूत ठरत असून येथील जलचर जीवांना धोका निर्माण झाला आहे.सोमवारी तलावातील महादेव मंदिर परिसरात एक कासव मृत झाल्याचे व्हाईट आर्मीचे अवधूत भोसले, प्रशांत शेंडे यांना हे दिसून आले. त्यांनी वन विभागाला माहिती दिली. वन विभागाचे समर्थ हराळे, अनिल ढोले यांनी येऊन मृत कासव तलावातून काढून विच्छेदनासाठी पाठवले. वनविभागाचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर त्यांनी ते ताब्यात घेतले.