लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी सरकारने ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी घोषित केली असली तरी अर्जासाठी आॅनलाईन ठेवलेली पद्धती क्लिस्ट व तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे प्रत्यक्षात सात ते आठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल. ज्यामुळे भाजप सरकारचे पितळ उघडे पडेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केले.कृषी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, एक कोटी अर्ज दाखल झाले, तर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या म्हणण्यानुसार ७० लाख अर्ज मिळाले. प्रत्यक्षात मात्र ५३ लाख शेतकºयांनीच आॅनलाईन अर्ज केल्याचे दिसते आहे. यामुळे गोंधळ उडाला आहे. तरी सरकारने कृषी कर्जमाफीच्या अर्जांचा नेमका आकडा जाहीर करावा, अशी मागणी करून खासदार शेट्टी म्हणाले, आॅनलाईन अर्जासाठी जाचक अटी लावण्यात आल्या. आॅनलाईनवर तांत्रिक अडचणी जादा असल्यामुळे शेतकरी अर्ज भरताना त्रस्त झाले आहेत. कुटुंबाला एकच अर्ज भरण्याची अट असून, महिलांना प्राधान्य आहे. हे शासनाला माहीत असूनसुद्धा शासन मखलाशी करीत आहे. पती-पत्नी दोघेही शेतकरी असल्याबाबत दोघांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. शासनाच्या अशा या प्रकारच्या वागणुकीमुळे कर्जबाजारी शेतकºयांना अपमानास्पद कर्जमाफी दिली जात आहे, अशी टीका करून खासदार शेट्टी यांनी, शासनाला कृषी कर्जमाफीचा फार्स करावयाचा आहे, असा आरोप केला.ऊस दर शेतकरीच ठरवतीलऊस दर मीच ठरविणार, असे कुणी म्हणू नये. आणि माझासुद्धा तसा दावा नाही. कारण गेली अनेक वर्षे उसाचा दर शेतकरीच ठरवीत आला आहे. यंदासुद्धा उसाचा दर शेतकरीच ठरवतील, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता खासदार शेट्टी यांनी केली.संघटनेला भगदाड पडेल, म्हणून घाबरलो?शेतकºयांच्या नव्या संघटनेच्या घोषणेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भगदाड पडेल, म्हणून मी घाबरलो होतो, अशी उपरोधिक टीका करताना शेट्टी यांनी, पण भगदाड वगैरे काही दिसत नाही, असे सांगितले.१७ वी ऊसपरिषद लवकरच१ आॅक्टोबरला बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे होणाºया भात परिषदेमध्ये १७ व्या ऊस परिषदेची तारीख घोषित करण्यात येईल. ज्या ऊस परिषदेमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे शेतकरी आपल्या उसाचा दर निश्चित करतील, असेही ते म्हणाले.शेतकºयांची दिल्ली परिषद यशस्वी होईलदेशातील सर्वच शेतकरी त्रस्त आहेत. भाषिक, प्रांतिक, धर्म-जात या भिंती भेदून २० नोव्हेंबरला शेतकरी नवी दिल्लीला आपली एकजूट दाखवतील. देशव्यापी होणारी ही शेतकºयांची परिषद शेतकºयांच्या एकजुटीमुळे यशस्वी होईल, असा विश्वास शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
कर्जमाफीत भाजपचे पितळ उघडे पडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:51 AM