कोल्हापूर, 4 : राज्य सरकारच्या कर्जमाफी मधील तांत्रीक दोषांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणारे सव्वा लाख शेतकरी वंचित राहणार आहेत. याचा निषेध करत शिवसेनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात शंखध्वनी केला. सॉफ्टवेअर मध्ये बदल करून या शेतकºयांना न्याय दिला नाहीतर सहकार मंत्र्याच्या कोल्हापूर जिल्हा दौºयावेळी काळे झेंडे दाखवण्याचा इशाराही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.
थकबाकीदार शेतकºयांना दीड लाखापर्यंत तर प्रामाणिकपणे परतफेड करणाºया शेतकºयांना २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी संबधित शेतकºयाने २०१५-१६ च्या कर्जाबरोबरच २०१६-१७ मधील कर्जाची जुलै २०१७ अखेर परतफेड करणे बंधनकारक आहे. ही बाब अन्यायकारक असून २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेडीची मुदत जुन २०१८ पर्यंत आहे. मुदतीपुर्वी कर्ज भरण्याची सक्ती सरकार कशासाठी करते, या सरकारला प्रामाणिकपणे कर्जमाफीची रक्कम द्यायची नाही, त्यामुळेच शेतकºयांना वंचित ठेवण्याचा मार्ग सरकार शोधत असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला.
केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटीचा पेच आहे. नाबार्ड व सहकार विभागाच्या आदेशानुसार अपात्र रक्कमेची २०१२ मध्ये पुर्नगठन झाले. त्यातील शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ न देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. नैसर्गिक न्याय तत्वानुसार या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. ही आमची मागणी असल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले.
याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माहिती दिली पण सॉफ्टवेअर मध्ये बदल करता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आमच्या दृष्टीने सॉफ्टवेअर महत्वाचे नाहीतर शेतकरी महत्वाचा असल्याने योग्य ती दुरूस्ती करून पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी मुरलीधर जाधव यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य दरवाजे बंद करून, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या विरोधातील घोषणा व शंखध्वनी करत शिवसेनेने परिसर दणाणून सोडला. यावेळी सुजीत चव्हाण, बाजीराव पाटील, शिवाजीराव पाटील, मधूकर पाटील, नामदेव गिरी, संभाजी भोकरे, सुनिल शिंत्रे, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, संदीप पाटील, राजू यादव, विराज पाटील, दत्ता पोवार, कृष्णात पोवार, बाबासाहेब पाटील, शशीकांत बिडकर, मेघना पेडणेकर, दिपाली शिंदे आदी उपस्थित होते.