लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारची कर्जमाफीतील फसवेगिरी व वाढत्या महागाईविरोधात करवीर तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने शुक्रवारी तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली. कर्ज परतफेडीवरून प्रोत्साहनपर अनुदानापासून शेतकºयांना वंचित ठेवू नका, यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार उत्तम दिघे यांना देण्यात आले. राज्य सरकारची कर्जमाफी फसवी असून, जाचक नियमांमुळे प्रामाणिकपणे परतफेड करणारे शेतकरी वंचित राहणार असल्याचे सांगत राष्टÑवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे म्हणाले, कमीत कमी शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ व्हावा, असे राज्य सरकारचे धोरण आहे.
ज्या शेतकºयांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात कर्जाची परतफेड केली, त्यांना २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे; पण हे मिळविण्यासाठी त्या शेतकºयांना २०१६-२७ या वर्षातील पीककर्जाची जुलै २०१७ पर्यंत परतफेड करण्याचे आदेश दिले. करवीर तालुक्यात ऊस उत्पादकांची संख्या मोठी आहे. साधारणत: आमच्याकडे जानेवारीनंतरच पीककर्जाची मोठ्या प्रमाणात उचल होते. त्यामुळे जानेवारी ते मार्चमध्ये घेतलेले कर्ज तीन महिन्यांतच परत कसे करायचे? असा पेच आहे. सहकार खात्याच्या नियमानुसार या कर्जाची जून २०१८ मध्ये परतफेड करणे बंधनकारक असताना सरकार आपल्याच नियमाची पायमल्ली करून शेतकºयांवर अन्याय करीत आहे. केंद्राच्या कर्जमाफीतील अपात्र शेतकºयांनाही या कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करीत असल्याची टीकाही जांभळे यांनी केली. ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा आगडोंब उडाला असताना सरकार मात्र हातावर हात ठेवून गप्प बसल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई, शेतकरी संघाचे संचालक जी. डी. पाटील, सुनील परीट, बापू महेकर, चंद्रकांत पाटील, सर्जेराव पाटील, नंदकुमार खाडे, प्रशांत सुतार, रामसिंग रजपूत, विष्णू तिबिले, सुरेश पाटील, रंगराव कोळी, राजाराम कासार, तानाजी शेलार, अरुण पाटील, विशाल पोवार, शिवाजी आडिसरे, संभाजी पाटील, किरण पाटील, मयूर जांभळे, दयानंद कांबळे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : कर्जमाफी व महागाईबाबत करवीर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे यांना कोल्हापुरात शुक्रवारी निवेदन देण्यात आले. यावेळी मधुकर जांभळे, शिवाजी देसाई, सुनील परीट, रंगराव कोळी, आदी उपस्थित होते. (फोटो-०६१०२०१७-कोल-करवीर)