पाच राज्यांतील निकालानंतरच युतीचा निर्णय : पाटीलकोल्हापूर : राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकीचा निकाल काय लागतो त्यानंतरच भाजप-शिवसेना युतीचा निर्णय होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.कर्नाटक पोटनिवडणूक निकालाची दखल घेवून युतीबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत का, असे विचारल्यावर पाटील म्हणाले, पोटनिवडणुकीवरून नव्हे तर पाच राज्यांतील निकालानंतर या घडामोडींना वेग येईल. लोकसभा आणि विधानसभेचे जागावाटप एकाच वेळी व्हावे, अशीच दोन्ही पक्षांची इच्छा आहे. या दोन्ही निवडणुकीत ज्या पक्षाचे विद्यमान खासदार-आमदार आहेत त्या जागा त्यांच्याकडेच राहतील. त्यामुळे लोकसभेला केवळ सहा जागांसाठीचे वाटप असल्याने त्यामध्ये फारसे मतभेद नाहीत. मात्र विधानसभेचे जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विधानसभेच्या भाजपाकडे १२३, शिवसेनेकडे ६३ व अपक्ष ७ अशा १९३ जागांचे वाटप निश्चित आहे. उर्वरित ९५ जागांसाठीचे वाटप हा कळीचा मुद्दा आहे. दोन्ही निवडणुकींचे जागावाटप एकाचवेळी करा असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाबद्दल थेट मागणी पुढे आली नसल्याचे त्यांनी सांगितले.औंरगाबाद, उस्मानाबादचे नामांतर व्हावेज्यांंनी आपल्यावर सत्ता गाजविली त्या परकीयांच्या खुणा पुसल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर व्हावे, अशी सरकारचीही इच्छा आहे. याची पुढची नेमकी प्रक्रिया काय आहे, याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू, असेही पाटील यांनी सांगितले.
पाच राज्यांतील निकालानंतरच युतीचा निर्णय : पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 6:21 AM