सरवडे : दुर्गमानवाड (ता. राधानगरी) येथील हिंडाल्को कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या गेले ३१ दिवस पगारवाढीसंदर्भात सुरू असलेल्या बंदमुळे बॉक्साईट वाहतूक ठप्प आहे. कंपनी आणि कामगार युनियन यांच्या वादात मात्र सुमारे ४०० ट्रकमालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान, सोमवारी कंपनी अधिकारी, कामगार युनियन व ट्रकमालक यांच्या संयुक्त बैठकीत तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्या उपस्थितीत कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय झाला. मात्र, बंद कालावधीतील पगार मिळावा, या कामगारांच्या मागणीवर आता घोडे अडले आहे.हिंडाल्को कंपनीने बेळगाव येथील कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली. मात्र, जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगारांना पगारवाढ दिली नाही. त्यामुळे कंपनीकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने २ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले. त्यानंतर एकदिवसीय उपोषणही करण्यात आले. हिंद मजदूर कामगार संघटनेने त्रैवार्षिक करारानुसार पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला. प्रत्येक तीन वर्षाने कंपनी पगारवाढ देते. सध्याच्या कराराची ३० जून २०१४ ला मुदत संपली तरी कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. म्हणून कामगारांनी पगारवाढीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनास अधिक वेळ लागल्याने ट्रकमालकांनीही बॉक्साईट वाहतूक सुरू करा; अन्यथा कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.त्यामुळे कंपनीचे अधिकारी, ट्रकमालक व कामगार युनियनचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी झाली. त्यावेळी कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय झाला. मात्र, काम बंद कालावधीतील दिवसांचा पगार कंपनीने द्यावा, ही मागणी कंपनीने मान्य केली नाही. त्यामुळे अजून बॉक्साईट वाहतूक बंद आहे.दुर्गमानवाड येथून १९९२ पासून बॉक्साईट वाहतूक सुरू आहे. बॉक्साईट उत्खननास २००४ पर्यंत कोणतीच तक्रार नव्हती. परंतु, त्यानंतर विविध कारणामुळे तणाव, वाद सुरू झाले. सध्या त्रैवार्षिक करारानुसार कर्मचाऱ्यांना वेळेत पगार न दिल्यामुळे कंपनीच्या विरोधात कामगारांचा संताप व उद्रेक झाला. (वार्ताहर)ट्रकमालकांची मागणीगेले ३१ दिवस काम बंद असल्यामुळे बॉक्साईट वाहतूक बंद असल्याचा फटका बॉक्साईटची वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकांना बसत आहे. कंपनी व केवळ १८ ते २० कामगारांच्या वादात या विभागातील सुमारे ४०० ट्रकमालक-चालक आर्थिक अडचणीत आले आहेत. तरी या बंदबाबत दोन दिवसांत निर्णय व्हावा व १५ दिवसांत ७ ते ८ खेपा मिळाव्यात, प्रत्येक दिवशी १७० ट्रक भरावेत, अशी मागणी व्यवस्थापन बैठकीत ट्रकमालकांनी केली आहे.
विकास आराखड्याचा आज होणार फैसला ?
By admin | Published: March 04, 2015 12:30 AM