केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्यांची गळचेपी चालविली आहे. त्याविरोधात दिल्ली येथे लाखो शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून आज देशव्यापी बंद आयोजित केला आहे.
या आंदोलनात डावे पक्ष, शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह लोकशाहीवादी सर्व पक्ष संघटना सहभागी होणार आहेत. या बंदमध्ये आजरा तालुक्यातील सर्वपक्षीय संघटनांनी जनता बँकेत झालेल्या सभेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी मुकुंद देसाई, जयवंत शिंपी, विष्णुपंत केसरकर, बाबूराव नाईक, अल्बर्ट डिसोझा, जनार्दन बामणे, तानाजी देसाई, प्रकाश मोरस्कर, नवनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------
* आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली, बाजारपेठ बंद
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी आजऱ्यात ९.३० वाजता शिवाजी पुतळ्यापासून रॅली निघणार आहे. रॅली संभाजी चौकात आल्यानंतर तहसीलदार यांना निवेदन दिले जाणार आहे. आजऱ्याची बाजारपेठ बंद राहणार आहे.