कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील आणि मी उद्या मंगळवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटणार आहोत. त्यावेळी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊ आणि त्यानंतरच लॉकडाऊन कडक करण्याबाबत निर्णय घेवू असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सामूहिक संसर्गाची भीती व्यक्त होत आहे.रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर नाईलाजाने लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय आम्हांला घ्यावा लागेल.त्याशिवाय आजच्या घडीला दुसरा कोणताही मार्गच नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनीही करायचा असेल तर एकदम कडक लॉकडाऊन करावा अशी भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज बिलाविरुद्धातील आंदोलन केल्यानंतर पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले ज्यावेळी रुग्णसंख्या कमी होती तेव्हा कडक लॉकडाऊन होते आणि आता रुग्ण वाढू लागलेत आणि व्यवहार सुरू झाले आहेत.लॉकडाऊन केल्याने गोरगरिबांच्या रोजीरोटीचा प्रश्न तयार होतो पण करायचाच असेल तर मग एकदा निर्णय घेऊन कडक लॉकडाऊन करा तरच संसर्गची साखळी तुटेल.निर्णयघेतलेलानाही : पालकमंत्रीलॉकडाऊन करण्यापेक्षा लोकांनीच अधिक काळजी घेणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, अनावश्यक गर्दी टाळणे या गोष्टी पाळल्या पाहिजेत. लोकांना त्याचे गांभीर्य लक्षात येऊ लागले आहे. रविवारी सुट्टी असूनही शहरात गर्दी कमी होती. लॉकडाऊन केल्यास अर्थचक्रास पुन्हा ब्रेक लागू शकतो. गोरगरिबांच्या रोजी रोटीचा प्रश्न तयार होतो. त्यामुळे आपण सर्वांनीच काळजी घेऊया म्हणजे लॉकडाऊन कडक करण्याची गरज भासणार नाही. पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये लॉकडाऊन नंतर लोकांतून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या सगळ्या बाबीचा विचार करून लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतलेला नाही असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.दोनमतप्रवाह
लॉकडाऊन कडक करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत.ज्या वर्गाचा रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न नाही त्याला लॉकडाऊन कडक करावा असे वाटते. पण ज्याचे हातावरील पोट आहे त्याचा मात्र त्यास तीव्र विरोध दिसत आहे. हे दोन्ही मतप्रवाह मंत्री आणि जिल्हा प्रशासनापर्यंत गेले आहेत..