चव्हाण म्हणाले, गावपातळीवर सध्या महाआयुष सर्वेक्षणाच्या माध्यमातून ज्येष्ठ, व्याधीग्रस्त नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन हजार आशा कर्मचाऱ्यांच्यामार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे. या सर्वांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना एक हजार रुपये मानधन ग्रामपंचायतीतून द्यावे, असे लेखी आदेश देण्यात आले आहेत, तसेच त्यांना मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर वितरित करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
काही ठिकाणी आशा कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरण्याच्या घटना घडल्या आहेत. संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मी नागरिकांना आवाहन करतो की, कोरोनाच्या या कठीण काळात आशा कर्मचारी मोठ्या हिमतीने काम करत आहेत. त्यांचे हे शासकीय काम असल्याने त्यांच्या कामात अडथळा आणल्यास ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.