शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

लिंब नेसण्याच्या विधीत पाच रुपये दरवाढीचा निर्णय

By admin | Published: December 07, 2015 12:09 AM

रेणुका भक्त संघटनेची सभा : बेळगाव प्रशासनाकडून दीड कोटी

कोल्हापूर : सौंदत्ती (कर्नाटक) येथे डोंगरावर यल्लमादेवीच्या यात्रेकरूंना मूलभूत सुविधा देण्यासाठी व त्यांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगावचे जिल्हाधिकारी यांनी १ कोटी २८ लाखांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला. या विकासकामांची तत्काळ सुरुवात केल्याने यंदा भाविकांची काहीअंशी गैरसोय कमी होणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या रविवारी झालेल्या सभेत देण्यात आली तसेच जोगुळाभावी कुंडावर यंदा लिंब नेसण्याच्या विधीसाठी दहा वर्षांनंतर पाच रुपये दरवाढ करण्यासही एकमताने मंजुरी देण्यात आली. साकोली कॉर्नरजवळील भय्यासाहेब परदेशी हॉल येथे कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. ज्येष्ठ सदस्य दीपक जाधव यांच्या हस्ते रेणुकादेवीची प्रतिमा पूजन करून सभेला प्रारंभ केला. यावेळी कायमस्वरूपी पिण्याचे पाणी, कुंडांच्या ठिकाणी अंघोळीसाठी शॉवर व महिलांसाठी शौचालय, रस्त्यांच्या कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने सौंदत्ती डोंगरावर यात्रेकरूंची गैरसोय थोडी कमी होणार आहे. याबद्दल बेळगावचे जिल्हाधिकारी एन. जयराम यांचे विशेष आभार मानण्यात आले.संघटनेचे संस्थापक सुभाष जाधव यांनी, जोगुळाभावी कुंडाजवळ यंदा जर स्वच्छ पाणी नसेल तर कोल्हापुरातील जगवाले पुजारी यांनी कोल्हापूर भक्तांकरिता आपले जग रेणुका सागर जलाशय येथे आणून तेथेच लिंब नेसण्याचा विधी करावा, असे आवाहन केले. याला जगवाले पुजारी यांनी मान्यता दिली तसेच जगवाले पुजारी दत्तात्रय पवार यांनी वाढती महागाई लक्षात घेता यंदा लिंब नेसण्याच्या विधीसाठी पाच रुपये दरवाढ करावी, अशी मागणी केली. त्याला सभेत सर्वानुमताने मंजुरी दिली. त्यामुळे दहा वर्षांनंतर ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे यंदा लिंब नेसण्यासाठी ३५ रुपये द्यावे लागणार आहेत. स्वागत संघटनेचे अध्यक्ष गजानन विभूते यांनी केले, तर संघटनेचे संस्थापक सदस्य अच्चुत साळोखे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार मानले. सभासद प्रभाकर पायमल, बाळासाहेब गंगाजळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर विभागीय एस. टी. महामंडळाचे स. वाहतूक अधीक्षक आर. बी. चव्हाण व संभाजीनगरचे स्थानक प्रमुख विजय हवालदार यांनी यात्रेच्या दराबाबत माहिती दिली. संघटनेचे सरचिटणीस युवराज मोळे, चिटणीस आनंदराव पाटील, खजानिस मोहन साळोखे, सदस्य अशोकराव जाधव, धनाजी पवळ, दयानंद घबाडे, आनंदराव पाटील, सुनील जाधव, केशव माने, तानाजी बोरचाटे, रमेश बनसोडे, शालिनी सरनाईक, विजया डावरे, राणी मोगले, देवक पुजारी शिवाजीराव आळवेकर, दत्ता पोवार, गज्जू यांच्यासह सभासद उपस्थित होते. (दरपत्रक पान ६ वर)सर्वतोपरी मदत करू : महापौर सभेच्या दरम्यान नूतन महापौर अश्विनी रामाणे यांचा संघटनेच्यावतीने विशेष सत्कार कण्यात आला. याप्रसंगी रेणुका भक्तांसाठी महानगरपालिकेच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. विद्यमान संचालक मंडळ कायमविद्यमान संचालक मंडळ यापुढे २०१५-२० पर्यंत पुढील पाच वर्षांकरिता कायम ठेवण्यास सभेत एकमताने मंजूर देण्यात आली. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळ यापुढे कायम राहणार आहे.