कोल्हापूर: पंचगंगा नदीकाठच्या ३९ गावांची तातडीने बैठक घ्या, अशा सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सीईओ अमन मित्तल यांना शुक्रवारी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहात झालेल्या डीपीडीसी बैठकीत ग्रामीण भागातील पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठी २२ कोटींचा डीपीआर तयार करण्याचाही निर्णय झाला. १४ व्या वित्त आयोगाकडील निधीतून हा खर्च करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्तावही पालकमंत्र्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर ठेवला.महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच डीपीडीसीची बैठक झाली. या बैठकीत पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदुषणावर चिंता व्यक्त करण्यात आली. येत्या दोन वर्षात पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून यंत्रणेने कामाला लागावे अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.