शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत लवकरच निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:19 AM

कोल्हापूर : धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. लवकरच या संदर्भात योग्य निर्णय ...

कोल्हापूर : धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. लवकरच या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी दिले. आरक्षणाची अंमलबजावणी करा, या मागणीचे निवेदन जिल्हा काँग्रेस कमिटीत पालकमंत्री पाटील यांना कोल्हापूर जिल्हा धनगर समाज समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने दिले.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सर्वच लोकप्रतिनिधी अनुकूल आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी सरकार हे धनगर समाजाला न्याय देणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील धनगर समाजातील सर्व संघटना आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आल्या आहेत. त्यांनी जिल्हा धनगर समाज समन्वय समितीची स्थापना केली आहे. आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करा, अशी समितीची प्रमुख मागणी असल्याचे राजेश तांबवे, बबनराव रानगे यांनी सांगितले. यावेळी प्रा. राजेंद्र कोळेकर, शंकर पुजारी, कृष्णात पुजारी, मच्छिंद्रनाथ बनसोडे, बयाजी शेळके, छगन नांगरे, लक्ष्मण करपे, राघू हजारे, महादेव सणगर, तम्मा शिरोले, डॉ. संदीप हजारे, विकास घागरे, प्रकाश गोरड, बाबूराव रानगे, राजेश बाणदार, खानदेव पिराई, प्रल्हाद देबाजे, संभाजी पिराई, आदी उपस्थित होते.

फोटो (०६१२२०२०-कोल-धनगर समाज निवेदन) : कोल्हापुरात रविवारी आरक्षणाबाबतच्या मागणीचे निवेदन जिल्हा धनगर समाज समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले.