हुपरी : हुपरीत नगरपालिका व्हावी, या मागणीला कृती समितीमुळे बळ मिळाले असून, आता नगरपालिका आणायचीच या निर्धाराने आपण प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी केले.हुपरी नगरपालिका कृती समितीच्यावतीने अंबाबाई मंदिराच्या सभागृहात आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजकल्याण सभापती किरण कांबळे होते.प्रारंभी निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी बोलताना विविध वक्त्यांनी नगरपालिकेसाठी ‘आर या पार’ ची लढाई लढू, असा निर्धार व्यक्त केला. मिणचेकर यांनी कृती समितीमुळे पूर्ण गाव एकवटल्याचे सांगून याबाबत नगरविकास राज्यमंत्र्यांशी संपर्क साधून नगरपालिका प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांनी नगरपालिका प्रश्नी प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल, मात्र शासकीय अधिकाऱ्यांना घेराव घालून मागणी मान्य करण्यास भाग पाडू, असे सांगितले.यावेळी उपसरपंच राजेंद्र सुतार, माजी सरपंच मंगलराव माळगे, दौलतराव पाटील, नानासोा भोसले, अभयसिंह घोरपडे,अजितराव सुतार, सुदर्शन खाडे, प्रमोद साळोखे, प्रकाश देशपांडे, शाहू गायकवाड, राजेश होगाडे, लालासोा देसाई, अशोकराव खाडे, गणेश कोळी, गणेश वार्इंगडे, धर्मवीर कांबळे, बाळासाहेब रणदिवे, संभाजी हांडे, गणेश मालवेकर, प्रतापसिंह देसाई, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)शुक्रवारी मंत्रालयात बैठकशुक्रवारी (दि. २७) नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात हुपरी नगरपालिकेसंदर्भात बैठकीचे आयोजन केल्याची माहिती यावेळी आमदार सुजित मिणचेकर यांनी दिली....तर सर्व सदस्यांचे राजीनामेहुपरीसारख्या ६० हजार लोकसंख्येच्या गावात नगरपालिका करण्याकडे जर शासनाने दुर्लक्ष केले, तर सर्व सदस्य राजीनामा देऊन ग्रामपंचायत बरखास्त करतील, असा इशारा यावेळी उपसरपंच राजेंद्र सुतार यांनी दिला. त्यास टाळ्या वाजवून ग्रामस्थांनी दाद दिली.
हुपरी पालिकेसाठी निर्णायक लढा
By admin | Published: March 24, 2015 8:02 PM