सदाशिव मोरे
आजरा : कर्नाटक सरकारच्या दडपशाहीमुळे सीमाभागात मराठी भाषा व संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. कारवारमधील १०० मराठी शाळा बंद झाल्या. त्याचे महाराष्ट्रात कुठेही पडसाद नाहीत हे दुर्दैव आहे असे स्पष्ट प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांनी केले. ते आजरा येथे लोकशाहीर द.ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील तर प्रमुख उपस्थितीत आमदार प्रकाश आबीटकर होते.
जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी स्वागत तर कॉ. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. सीमालढ्याचे नेते व स्वातंत्रसैनिक काॅ. कृष्णा मेणसे ( बेळगाव ) यांना द.ना.गव्हाणकर स्मृती पुरस्कार प्रदान डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते प्रदान करणेत आला. यावेळी आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मनोगत मांडले
कार्यक्रमास माजी आमदार श्रीपतराव शिंदे, जयवंत शिंपी, अंजना रेडेकर, संभाजी पाटील, एम.के. देसाई, जनार्दन टोपले, सुनील शिंत्रे, आनंदा मेणसे, सुधीर देसाई, अल्बर्ट डिसोझा, रचना होलम, अस्मिता जाधव, संजय पाटील, युवराज पोवार यासह आजरा तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार अशोक शिवणे यांनी मानले.
लोकशाहीर गव्हाणकर स्मृती पुरस्कार व स्मारक समितीला डॉ.जयसिंगराव गायकवाड यांच्याकडून पाच हजार रुपये जाहीर तर पुरस्काराची रक्कम लोकशाहीर द.ना.गव्हाणकर स्मृती पुरस्कार व स्मारक समितीकडे काॅ. कृष्णा मेणसे यांच्याकडून जमा.