कोल्हापूर एक आठवड्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पहिल्यांदा कमी आला आहे. गेल्या २४ तासांत १३९५ नवीन रुग्ण नोंद झाले असून ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. हीच संख्या आणखी घटवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका स्वीकारली आहे. नव्या रुग्णांपेक्षा कोरानोमुक्त झालेल्यांची संख्या अधिक असून ती १५२९ इतकी आहे.
जिल्ह्यात २५ मे नंतर पहिल्यांदा १४०० च्या खाली रुग्णसंख्या आली आहे. कोल्हापूर शहर, करवीर आणि हातकणंगले या तीन ठिकाणची रुग्णसंख्या वाढतीच असून या ठिकाणी कोरोना नियंत्रणासाठी जादा परिश्रम घ्यावे लागणार आहेत. कोल्हापूर शहरात ३८७, करवीर तालुक्यात २१८ तर हातकणंगले तालुक्यात १५१ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यातील ४१ जणांचा तर इतर जिल्ह्यातील चौघांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला असून मृतांच्या संख्येत हातकणंगले आघाडीवर आहे. हातकणंगले तालुक्यातील १०, कोल्हापूर शहरातील ८, तर करवीर तालुक्यातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
मृतांची तालुकावार आकडेवारी
हातकणंगले १०
नागाव फाटा, भेंडवडे २, हुपरी, नवे चावरे, सावर्डे, हेर्ले, कोरोची, पेठ वडगाव, लक्ष्मी वसाहत हातकणंगले
कोल्हापूर ०८
शास्त्रीनगर, कोल्हापूर २, वर्षानगर, बिंदू चौक, जवाहरनगर, लक्ष्मीपुरी, टेंबलाईवाडी
करवीर ०७
निगवे खालसा, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव २, दऱ्याचे वडगाव, वाकरे २
शिरोळ ०५
तारदाळ २, अब्दुललाट, मादनाईक मळा जयसिंगपूर, राजापूर
आजरा ०३
दर्डेवाडी, मुमेवाडी, सिरसंगी
गडहिंग्लज ०३
शेंद्री, मुत्नाळ, कडलगे
कागल ०१
मासा बेलेवाडी
भुदरगड ०१
नीळवडे
कागल ०१
निळवडे खुर्द
इचलकरंजी ०१
गणेशनगर
पन्हाळा ०१
वाघवे
इतर जिल्हे ०४
कारदगा, सौंदलगे, नांद्रे, आचरा