खासदार मंडलिक यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या प्रयत्नांमुळे शिनोळीसारख्या औद्योगिक वसाहतीत दवाखाना खास बाब म्हणून मंजूर होऊन त्याचा लोकार्पण सोहळा पार पडल्याबद्दल ग्रामपंचायत शिनोळीतर्फे खासदार मंडलिक व यथोचित पाठपुरावा केल्याबद्दल आमदार राजेश पाटील यांचा सत्कार झाला.
संबंधित दवाखाना झाल्यामुळे या स्किमच्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर उपचार मिळण्यास मदत होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार मिळणार असल्याची माहिती मंडलिकांनी सांगितले. दवाखाना भागातील शाश्वत विकासाचा महत्त्वाचा टप्पा असून, ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा बळकट करणे व प्रयत्नाने शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने सीमाभागात शिनोळी या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र यशस्वी होण्यापाठीमागे कै. आमदार नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांची पुण्याई असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या महामारीत सुरू झालेला दवाखाना ही आपल्या तालुक्यासाठी मोठी देणगीच ठरेल. याचा लाभ बहुतांश लोकापर्यंत पोहचावा, तसेच खासदार मंडलिक यांच्या माध्यमातून जे प्रयत्न सुरू आहेत, ते असेच राहिल्यास चंदगडला जो दुर्गम भागाचा लागलेला बट्टा लवकरच पुसला जाऊन येथे सर्व भौतिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार राजेश पाटील आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुनील शिंत्रे, विज्ञानंद मुंडे यांची मनोगते झाले. प्रल्हाद जोशी यांनी आभार मानले.
या वेळी बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई, परशुराम पाटील, अरुण सुतार, रूपा खांडेकर, एस. वाय. पाटील, भिकू गावडे, जानबा चौगुले, विनोद पाटील, मारुती पाटील, नितीन पाटील, पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------------
फोटो ओळी : शिनोळी (ता. चंदगड) येथे महाराष्ट्र राज्य कामगार विमा कापोर्रेशन (इएसआयएस) अंगीकृत सुसज्ज व परिपूर्ण सेवा दवाखान्याचा लोकार्पण खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार राजेश पाटील, अभय देसाई, सुनील शिंत्रे, भिकू गावडे आदी उपस्थित होते.
क्रमांक : १४०६२०२१-गड-०६