आजरा : राज्यातील सरपंचसाठी आणि ग्राम विकासासाठी कार्य करणाऱ्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या नोंदणी अॅपचे लोकार्पण हिवरे बाजारचे सरपंच तथा आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व राज्य कार्यकारिणी सदस्य राजाराम पोतनीस यांनी दिली.
नोंदणी अॅपचे गुरुवारी (२७) मे दुपारी १ वाजता आदर्श गाव हिवरे बाजार येथे निवडक राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळून पवार यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे.
नोंदणी अॅपचा हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामविकासातील तज्ज्ञ व्यक्ती व ग्रामस्थांना सहभागी होता येणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल गीते-पाटील व प्रदेश सरचिटणीस अॅड. विकास जाधव यांनी दिली.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून सहभागी व्हावे, असे आवाहन महिला अध्यक्षा राणीताई पाटील, उपाध्यक्षा अश्विनीताई थोरात, कोअर कमिटीप्रमुख अविनाश आव्हाड, राज्य कार्यकारिणी सदस्य राजीव पोतनीस, शिवाजी आप्पा मोरे, किसन जाधव, पांडुरंग नागरगोजे, आनंद जाधव, सुधीर पठाडे, सुप्रिया जेधे, नारायण वनवे, कोल्हापूर कार्याध्यक्ष संभाजी सरदेसाई, आजरा तालुकाध्यक्ष संतोष बेलवाडे, महिलाध्यक्षा मनीषा देसाई यांनी केले आहे.