वडणगे : वडणगे (ता. करवीर) येथील धनगर गल्ली आणि चौगले मळ्यातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या कामांसाठी ग्रामपंचायतीसह विविध फंडांतून लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
धनगर गल्लीतील अनेक वर्षे रेंगाळलेले गटाराचे काम आणि चौगले मळ्यातील गटारकामही पूर्ण झाले आहे. चौगले पाणंदीचे रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून, मजबुतीकरणासाठी आणखी निधी देण्याचे नियोजन आहे. या सर्व कामांसाठी वडणगेचे सरपंच सचिन चौगले आणि सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. प्रवीण चौगले, निवास चौगले, मदन चौगले, लखन चौगले, सागर लांडगे, राहुल लांडगे, उत्तम जोंग यांच्यासह आंबे गल्ली व धनगर गल्लीतील ग्रामस्थांनी यासाठी पाठपुरावा केला होता. विस्तारीत भागासह प्रभागाला विकासाचे मॉडेल बनवले असून, त्याच व्हिजनने गावातही कोट्यवधींची विकासकामे केल्याचे सरपंच सचिन चौगले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सीमा पोतदार, माणिक जाधव, सेवा संस्था सभापती सुनील लांडगे, माजी उपसभापती राजेंद्र चौगले, भगवान चौगले, राजेंद्र लांडगे, देवापा लांडगे, सज्जन लांडगे, यशवंतबापू लांडगे, पंडित लांडगे, मारूती लांडगे, उत्तम जोंग, सुभाष ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश उदाळे, जितेंद्र सावंत, अजित पोवार, संतोष टिटवे, अमित गौड, संदीप तोडकर यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो : ०७ वडणगे विकासकाम
ओळी : वडणगे (ता. करवीर) येथील धनगर गल्लीतील विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याला सरपंच सचिन चौगले, सदस्य सीमा पोतदार, माणिक जाधव, सभापती सुनील लांडगे, प्रवीण चौगले, निवास चौगले, राजेंद्र चौगले, प्रकाश उदाळे उपस्थित होते.