ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर, महावीर पाटील, जीवंधर मुरचिटे, प्रकाश अकीवाटे यांच्या हस्ते घंटागाडीचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगामधून ही बहुउपयोगी घंटागाडी खरेदी करण्यात आली आहे. या घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा वेगळा संकलन करण्याची तसेच जंतुनाशक औषधफवारणी व धूरफवारणी मशीन जोडण्याची सोय असल्याने ग्रामस्वच्छता व निर्जंतुकीकरणासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर यांनी या उपक्रमाची माहिती देऊन स्वागत केले. याप्रसंगी उपसरपंच प्राची हिंगे, रंगराव कांबळे, वंदना कदम, वैशाली काळगे, बाबासो राजमाने, महेश कुंभार, सारंग काकडे, सरदार सुतार, शिवाजी दळवी, प्रदीप हिंगे, दत्तात्रय साळुंखे, सचिन मगदूम, राजू जांभळे, आनंदराव साने, परशुराम कत्ती, ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - २९०६२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथे बहुउपयोगी घंटागाडीचे लोकार्पण सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर, उपसरपंच प्राची हिंगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.