शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

दीपा मलिक यांचे ‘हेल्पर्स’शी दृढ नाते

By admin | Published: September 14, 2016 12:19 AM

मुलांना प्रेरणा : २०१० साली संस्थेच्या वसतिगृहातील मुलांसोबत घालविला होता काही वेळ

कोल्हापूर : रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू असा इतिहास रचणाऱ्या दीपा मलिक यांचे कोल्हापुरातील ‘हेल्पर्स आॅफ दी हॅँडिकॅप्ड’ या संस्थेशी दृढ असे नाते आहे.गो-कार्टिंग रेसमध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या मुलीसोबत त्या २०१० साली कोल्हापुरात आल्या असता हॉटेल वा लॉजिंगमध्ये न उतरता ‘हेल्पर्स’मधील मुलांसोबत त्यांनी वेळ घालविणे पसंद केले. दोन दिवसांच्या सहवासात त्यांनी वसतिगृहातील मुलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.दीपा यांच्या कमरेखालील भाग अर्धांगवायूग्रस्त आहे. पाठीच्या कण्यातील ट्यूमरमुळे सतरा वर्षांपूर्वी त्यांचे चालणे-फिरणे बंद झाले. आतापर्यंत त्यांच्यावर तब्बल एकतीस वेळा शस्त्रक्रिया झाली आहे; परंतु अपंगत्वाने खचून न जाता नव्या जिद्दीने त्यांनी आयुष्याला तोंड दिले आहे. त्यांना आलेले अनुभव, आजारपणावर मात करीत थाळीफेक व गोळाफेकचा केलेला सराव यासंबंधी माहिती देत मुलांशी संवाद साधला होता. २०११ साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत थाळीफेक व गोळाफेकमध्ये त्यांनी रौप्यपदक पटकाविले आहे. आजारपणामुळे खचून न जाता त्यातून बाहेर कसे पडायचे व आपले भवितव्य कसे घडवायचे यासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘प्रयत्न केल्यास काहीही अशक्य नाही’ असा संदेश दिला. ‘हेल्पर्स’तर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली व संस्थेच्या शिवणकाम विभागाला भेट देऊन मुलांनी तयार केलेल्या कलात्मक शिलाईचे कौतुक केले.त्यावेळी दीपा यांनी दाखविलेल्या स्वत:च्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपटाने वसतिगृहातील मुलांना प्रेरणा मिळाल्याचे ‘हेल्पर्स आॅफ दि हॅँडिकॅप’ संस्थेचे वर्क्स मॅनेजर अविनाश कुलकर्णी यांनी सांगितले. २०१० साली दीपा मलिक कोल्हापुरात आल्या असता ‘हेल्पर्स आॅफ दी हॅँडकॅप्ड’ संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले होते.