रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. रत्नागिरीच्या नगर वाचनालय सभागृहात प्रथम भाजपची बैठक घेण्यात आली. या बैठकीत रितसर निवडणुकीद्वारे पटवर्धन यांची निवड झाली. कोणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने पटवर्धन यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.या निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी खासदार मनोज कोटक उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. सहा महिन्यांपूर्वीच भापजचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून अॅड. दीपक पटवर्धन यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यासाठी दोन अध्यक्ष असतील, तर पक्ष बळकटीला वेग येईल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार बुधवारी पटवर्धन यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.राजापूर, लांजा, रत्नागिरी व संगमेश्वर या चार तालुक्यांच्या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याकरिता ही निवड आहे. यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले, तर खासदार कोटक व प्रदेश उपाध्यक्ष लाड यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
भाजपचे दोन जिल्हाध्यक्ष - बिनविरोध निवड ; दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दीपक पटवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 1:04 PM
या निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी खासदार मनोज कोटक उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. सहा महिन्यांपूर्वीच भापजचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून अॅड. दीपक पटवर्धन यांची निवड करण्यात आली होती.
ठळक मुद्दे- उत्तर रत्नागिरीसाठीची निवड लवकरच