कोल्हापूर : रविवारी मृग नक्षत्र सुरू झाले असले तरी त्याची एंट्री मात्र कोरडीच गेली. दिवसभरात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊन राहिले. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून शिवार माणसांनी फुलली आहेत.यंदा १ जूनलाच मान्सूनने केरळ गाठले होते. त्यामुळे सात ते आठ दिवसांत तो गोवामार्गे महाराष्ट्रात दाखल होतो. त्यात अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातल्याने चार-पाच दिवस जोरदार पाऊस झाला. या चक्रीवादळाने मान्सून येण्याची गती वाढली. आता तो गोव्यात दाखल झाला असून, दोन दिवसांत तो महाराष्ट्रात येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.रविवारी रात्री १२ वाजून २७ मिनिटांनी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला. या नक्षत्राचे वाहन म्हैस आहे. मात्र मृग नक्षत्राची एंट्री कोरडीच गेली. दिवसभर खडखडीत ऊन राहिले. दुपारनंतर वातावरण काहीसे ढगाळ झाले. मात्र पाऊस पडला नाही. या नक्षत्रात शेतीस उपयुक्त पाऊस होईल, असा अंदाज आहे.दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. भाताच्या खोळंबलेल्या पेरण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. ज्वारी, सोयाबीनच्या पेरण्याही सुरू असून, काही ठिकाणी जमिनी तयार करण्यासाठी धांदल उडाली आहे. भात व नागलीचा तरवा टाकण्याचे कामही सुरू आहे.घरांच्या डागडुजीची गडबडपावसाळ्यापूर्वी घरांच्या डागडुजीसाठी ग्रामीण भागात गडबड सुरू झाल्याचे दिसते. मातीच्या जुन्या खापऱ्या काळाच्या ओघात नामशेष झाल्या असल्या तरी मंगलोरी कौलांची वर्षातून एकदा डागडुजी करावी लागते. पावसाळ्यात गळती लागू नये, याची दक्षता घेतली जात आहे.
मृगाची एंट्री कोरडीच, दिवसभर खडखडीत ऊन : पेरणीच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 1:57 PM
रविवारी मृग नक्षत्र सुरू झाले असले तरी त्याची एंट्री मात्र कोरडीच गेली. दिवसभरात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊन राहिले. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून शिवार माणसांनी फुलली आहेत.
ठळक मुद्देमृगाची एंट्री कोरडीच, दिवसभर खडखडीत ऊन पेरणीच्या कामांना वेग