कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीवरुन महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. सहाव्या जागेवरुन सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपनेही आपला तिसरा उमेदवार दिल्याने यानिवडणुकीला रंगत आली आहे. दरम्यान, भाजपच्यावतीने कोल्हापुरात आज, बुधवारी पूरग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत ‘टाहो मोर्चा’ काढण्यात आला होता यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक विधान केले आहे.राज्यसभा निवडणुकीमध्ये एक मोठा नेता पडणार असल्याची भविष्यवाणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर, भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक हे १०० टक्के निवडून येणार असल्याचा दावा देखील केला.यावेळी पाटील म्हणाले, भाजपचे नियोजन पक्के आहे. आम्ही घोडेबाजार करणार नाही. परंतू महाडिक निवडून येणार आणि मोठा नेता पडणार एवढे निश्चित. महाविकास आघाडीने वाटल्यास एकत्र आमच्यासोबत चर्चा करून त्यांच्यातील एक उमेदवार मागे घ्यावा. या सगळ्यांनाच झोपेत सुध्दा भाजप दिसतोय. हे खूप भांडतील. परंतू सरकार पडणार नाही. कारण सरकार पडल्यानंतर भाजपच येणार हे त्यांना माहिती आहे. परंतू सत्तेवर आल्यावर हिसाब किताब चुकता करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत एका मोठ्या नेत्याचा पराभव होणार, चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 5:02 PM