शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

साध्या यंत्रमागांच्या आधुनिकीकरणात दिरंगाई

By admin | Published: November 02, 2014 9:50 PM

वस्त्रनगरी प्रतीक्षेत : केंद्र सरकारच्या मंजुरीमध्ये क्लिष्टपणा; राज्य शासनाकडून अनुदानाची गरज

राजाराम पाटील / अतुल आंबी - इचलकरंजी -स्पर्धात्मक आणि आधुनिकीकरणाच्या युगात यंत्रमागांवर आधुनिक तंत्राची यंत्रे बसविल्यास निर्यातीत दर्जाच्या कापडाची निर्मिती होऊन यंत्रमाग कापडाचे मूल्यावर्धन होणार आहे; पण परिस्थितीने सामान्य असलेल्या यंत्रमागधारकाला यंत्रमागाच्या आधुनिकीकरणासाठी सरकारच्या प्रोत्साहन अनुदानाची गरज आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळूनही आधुनिकीकरणाचा हा प्रस्ताव रेंगाळलेलाच आहे, तर राज्य शासनाच्याही अनुदान धोरणाची यंत्रमागधारकांना प्रतीक्षा आहे. एकविसाव्या शतकाबरोबरच जगात आधुनिकीकरण व त्याबरोबर स्पर्धेचे युग आले. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी इचलकरंजी व परिसरात असलेल्या सव्वा लाख साध्या यंत्रमागांनाही आधुनिक तंत्राची गरज भासू लागली, ज्यामुळे उत्कृष्ट दर्जाचे कापड उत्पादन व त्याबरोबर महागाईला सामोरे जाण्यासाठी कापडास अधिक भाव याची आवश्यकता निर्माण झाली. साध्या यंत्रमागावर वार्प स्टॉप मोशन व वेफ्ट फिलर ही दोन यंत्रे बसविल्यास निर्यात दर्जाच्या कापडाचे उत्पादन होते, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मात्र, या दोन्ही यंत्रांची किंमत चाळीस हजार रुपयांपर्यंत आहे. साधारणत: २४ यंत्रमागांच्या कारखान्याला ९ लाख ६० हजार रुपयांची आवश्यकता असते. ही रक्कम एकाच वेळी गुंतविणे यंत्रमागधारकाला शक्य होत नाही. म्हणून सरकारमार्फत अनुदान प्राप्त झाल्यास सुलभ रोजगार देणाऱ्या यंत्रमाग उद्योगास प्रोत्साहन मिळेल. यासाठी अनुदान मागण्याची आवश्यकता भासू लागली.साध्या यंत्रमागांवर वार्प स्टॉप मोशन व वेफ्ट फिलरसाठी लागणारी रक्कम ही सामान्य यंत्रमागधारकास सरकारने अनुदान स्वरूपात दिली, तर प्रोत्साहन मिळून यंत्रमागधारकांबरोबर कामगारांनाही चांगली मजुरी मिळेल, अशी मागणी केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे गेली चार वर्षे करण्यात आली. शहरातील इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन, यंत्रमागधारक जागृती संघटना यांच्यासह माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी जोरदार प्रयत्न केले. वर्षभरापूर्वी केंद्र सरकारने प्रती यंत्रमागासाठी १५ हजार रुपये अनुदान जाहीर केले; पण सरकार पातळीवर मात्र अंमलबजावणीसाठी दिरंगाईच आहे.वर्षभरापूर्वी मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात गेल्या तीन महिन्यांत ७८३ अर्जांना मंजुरी मिळाली आहे. आता संबंधित यंत्रमागधारकांनी केंद्रीय वस्त्रोद्योग खात्याकडे नोंदणी केलेल्या संस्थेकडून वार्प स्टॉप मोशन व वेफ्ट फिलर ही दोन यंत्रे बसविण्याची आहेत. मग त्याची पाहणी वस्त्रोद्योग आयुक्तालयाकडून केल्यानंतरच अनुदान प्राप्तीचे शिक्कामोर्तब होणार आहे. अशी काहीशी क्लिष्ट पद्धती सरकारने अवलंबली आहे. त्यामुळेही ही अनुदान योजना रेंगाळली आहे.याशिवाय यंत्रमागधारकांना राज्य शासनाकडून मिळणाऱ्या १५ हजार रुपयांच्या अनुदानाचीही प्रतीक्षा आहे; पण हा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. आता बदललेल्या राज्य सरकारच्या धोरणाचा नवीन प्रश्नही उभा राहिलेला आहे. एकूण सव्वा लाख यंत्रमागांच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे आठ हजार यंत्रमागधारकांना प्रतीक्षा आहे.३७५ कोटी रुपये अनुदान प्रती यंत्रमागास पंधरा हजार रुपयांप्रमाणे केंद्र सरकारकडून आणि पंधरा हजार रुपये राज्य सरकारचे असे तीस हजार रुपये मिळणे आवश्यक आहे. दोन्ही सरकारकडून ३७५ कोटी रुपये अनुदान मिळेल, तर यंत्रमागधारकांना १२५ कोटी रुपये गुंतवावे लागतील.दहा कोटी रुपयांचे मूल्यावर्धनआधुनिकीकरणामुळे कापडाचा दर्जा सुधारण्याबरोबर उत्पादनही वाढणार आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांना सरासरी प्रती मीटर कापडाचे दहा रुपये मूल्यावर्धन होऊन दहा कोटी रुपये अधिक मिळणार आहेत.तीन जिल्ह्यांत व्याप्तीयंत्रमाग आधुनिकीकरण अनुदानाची इचलकरंजीसह वडगाव, रेंदाळ, कुरुंदवाड, विटा, माधवनगर-सांगली, कऱ्हाड-सातारा अशा व्यापक परिसरातील यंत्रमाग केंद्रांनाही आवश्यकता आहे.सीईटीपी अनुदानाची आवश्यकतायंत्रमागावर निर्मित कापडाला अंतिम टप्प्यामध्ये प्रोसेसिंगची आवश्यकता असते, ज्यामुळे यंत्रमाग कापडाचे चांगले मूल्यावर्धन होते. प्रोसेसिंग कारखान्यातून निघालेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (सीईटीपी) आवश्यकता आहे; पण सीईटीपीचा होणारा खर्चही प्रचंड आहे. तरी सीईटीपीलासुद्धा शासनाने उत्पादनाशी निगडित अनुदान द्यावे, अशीही मागणी येथील उद्योजकांची आहे.