शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शाहू समाधीचे काम पोलीस बंदोबस्तात, पोलीस अधीक्षकांना भेटणार शिष्टमंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 1:24 PM

नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचा निर्धार महानगरपालिका पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना भेटून पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती एक-दोन दिवसांत केली जाणार आहे.

ठळक मुद्देशाहू समाधीचे काम पोलीस बंदोबस्तातपोलीस अधीक्षकांना भेटणार शिष्टमंडळ

कोल्हापूर : नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचा निर्धार महानगरपालिका पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना भेटून पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती एक-दोन दिवसांत केली जाणार आहे. समाधिस्थळाच्या सभोवती सुरू असणारे संरक्षक भिंतीचे काम सिद्धार्थनगरातील काही कार्यकर्त्यांनी थांबविले असून, चर्चेतूनही हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.ज्या राजाने संपूर्ण देशाला आपल्या कृतीतून तसेच विचारातून सर्वांगीण प्रगतीची दिशा दिली, अस्पृश्यता निवारणापासून ते समाजाच्या सर्वच क्षेत्रांत अनेक मानदंड निर्माण केले, अशा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केलेल्या इच्छापत्रानुसार त्यांची समाधी नर्सरी बागेत बांधण्यात येत आहे.

शाहू महाराजांची कृपा असल्यामुळे त्यांच्या या कामात कोणतेही आढेवेढे न घेता महापालिका प्रशासनाने स्वनिधीतून समाधीचे काम करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर निधीअभावी काम थांबणार नाही, याची हमी दिली. त्यानुसार गतीने काम सुरू झाले; परंतु सिद्धार्थनगरातील काही कार्यकर्त्यांनी हे काम थांबविले आहे. त्यामुळे गेल्या दहा-बारा दिवसांपासून संरक्षक भिंतीचे काम बंद पडले आहे.नर्सरी बागेतील समाधिस्थळी जाण्याकरिता सिद्धार्थनगराकडील बाजूने एक स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमधील व्यायामशाळा स्थलांतरित करू नये तसेच पार्किंगची व्यवस्था सिद्धार्थनगराच्या बाजूला करू नये, अशा तीन-चार प्रमुख मागण्या तेथील कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.

परंतु शाहू समाधीचे पावित्र्य तसेच संरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याने समाधिस्थळ हे चारी बाजूंनी भक्कम संरक्षक भिंती उभारून बंदिस्त केले जाणार आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूने एकच प्रवेशद्वार ठेवले जाणार आहे. तथापि सिद्धार्थनगरातील नागरिकांनी मागील बाजूला आणखी एक स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवावे, अशी मागणी करून तेथील भिंतीचे काम थांबविले आहे.याबाबत महापौर सरिता मोरे यांनी पुढाकार घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महापौर मोरे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे काम किती दिवस बंद ठेवायचे असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या बैठकीत यावर गंभीरपणे चर्चा झाली.

शाहू महाराज यांच्या समाधीचे काम असल्यामुळे त्यात कोणी आडकाठी आणून कोणीही काम थांबवू नये, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त झाली. त्यानंतर पोलीस बंदोबस्त घेऊन समाधीचे काम पूर्ण करण्याचे तसेच पोलीस बंदोबस्त देण्याविषयी पोलीस अधीक्षकांना भेटण्याचे ठरले. एक-दोन दिवसांत शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे.

छत्रपती शाहूंच्या बाबतीत वाद नकोकोल्हापुरातील कोणतेही विकासकाम सहजासहजी पूर्णत्वास जात नाही. वादविवाद, आंदोलने यांमुळे अशा कामांना भलतीकडेच वळण लागते. नगरोत्थानची कामे, रस्ते प्रकल्प, पर्यायी शिवाजी पूल, घनकचरा व्यवस्थापन, पंचगंगा घाट सुशोभीकरण, चौकांचे सुशोभीकरण अशा अनेक कामांना त्याचा फटका बसला. दुर्दैवाने राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाच्या बाबतीतही हाच अनुभव येत आहे. पोलीस बंदोबस्त, वाद, संघर्ष अशा टप्प्यावर हा विषय जाऊ न देता एकमताने त्याचे काम पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. 

 

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीkolhapurकोल्हापूर