कोल्हापूर : अमृत योजनेतून पाइपलाइन टाकून झाल्यानंतर खुदाई केलेल्या रस्ते करण्यास टाळाटाळ करणा-या ठेकेदाराला हटवण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिले. महापालिकेमध्ये त्यांनी अचानक येऊन विकासकामांची आढावा घेतला. घरफाळा सवलत, आयटी पार्क, रोजंदारी कर्मचारी या संदर्भात संबंधित विभागप्रमुखांसोबत चर्चा करून आवश्यक त्या सूचना केल्या. प्रस्तावित केलेली विकासकामांच्या पाठपुरावा करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यावरून त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी गटनेते शारगंधर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी पदाधिका-यांनी अमृत योजनेतील कामे रखडले असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर पालकमंत्री म्हणाले, संबंधित ठेकेदाराकडून जर काम होत नसेल तर तेथे दुसरा ठेकेदार नेमा. दुसऱ्या टप्प्यातील अमृतच्या कामासाठी प्रस्ताव तयार करा. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे मात्र, पहिल्या टप्प्याप्यात पाइपलाइन टाकली गेली नसेल तेथील परिसराचा यामध्ये समावेश करा. यासाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून मंजूर करून घेऊ.
चौकट
शहरातील विविध चौकातील आयलँड सीएसआर फंड आणि लोकसहभागातून विकसित करण्यासाठी काही दानशूर व्यक्ती, संस्था इच्छुक होते. त्याचा पाठपुरावा का घेतला नाही. अंबाई टॅंकचे नूतनीकरण करण्यासाठी राज्य शासनाकडे यापूर्वी प्रस्ताव पाठविला होता. परंतु मनपा प्रशासनाने पाठपुरावा केला नसल्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावापैकी प्रलंबित कामांचे प्रस्तावाची प्रत देण्याचे आदेश यावेळी मंत्री पाटील यांनी दिले. शहराच्या विकासासाठी महापालिकेला विकास निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
चौकट
आयटी पार्कबाबत महापालिकाच उदासीन
आयटीपार्कसाठी बाहेरील कंपन्या येथे येण्यास इच्छुक आहेत. मात्र महापालिकेकडून ज्या ठिकाणी आयटी पार्क करायचे आहे. तेथे पायाभूत सुविधा देण्याबरोबर आयटीपार्क संदर्भातील निविदा प्रक्रिया राबवण्यास विलंब होत असल्याचे मंत्री सतेज पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
निधी देऊनही रस्ते का होत नाहीत
माजी गटनेते शारगंधर देशमुख यांनी गंगावेश ते शिवाजी पूल या रस्त्याच्या कामाचा प्रश्न उपस्थित केला. यावर पालमंत्री सतेज पाटील म्हणाले, रस्त्यासाठी निधी देऊनही कामे जलद गतीने का केली जात नाहीत. ड्रेनेजच्या कामासाठी जर हा रस्ता थांबला असेल तर ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता पूर्ण करा.
फोटो : १८०१२०२१ केएमसी बंटी पाटील न्यूज
ओळी : कोल्हापूर महापालिकेमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी अचानक येऊन विकासकामांचा आढावा घेतला.