कोल्हापूर : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत शिंगणापूर येथे पिढी घडविते भारी माता कोल्हापुरी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली.
यावेळी एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या मातांचा सन्मान करण्यात आला. कृषी अधिकारी कल्याणी पाटील यांनी, आपल्या यशात अंगणवाडी सेविका व शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. विक्रीकर सहायक प्रमोद कांबळे यांनी आपली संघर्षमयी वाटचाल सांगितली. बीट पर्यवेक्षिका अश्विनी आकुर्डे-सकटे यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा संकपाळ यांनी आभार मानले.
फोटो नं ०३०१२०२१-कोल-शिंगणापूर कार्यक्रम
ओळ : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिंगणापूर येथे ‘पिढी घडविते भारी माता कोल्हापुरी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
-