कोल्हापूर : येथे सर्किट बेंच व्हावे यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने शुक्रवारी आंदोलनाचे रणशिंग नव्याने फुंकले. आता अधिक तीव्र आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली.
मागील महिन्यात ज्येष्ठ वकिलांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी उच्च न्यायालयास दोन दिवसांत कोल्हापूरला सर्किट बेंच करावे असे पत्र सरकारच्यावतीने देतो, असा शब्द दिला होता परंतू तसे पत्र सरकारच्यावतीने देण्यात आले नाही म्हणून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक झाली आणि त्यामध्ये आंदोलनाचा कृती कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
तो असा :१) आजपासुन पुढे जिल्ह्यामध्ये कुठेही लोकन्यायालय असेल तिथे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन कामकाजात भाग घेणार नाही.२) १६ जानेवारी रोजी महापौराच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक.३) १७ जानेवारीस जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार.४) प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारीला ध्वजवंदन करुन जिल्हातील वकील न्यायालयीन कामकाज बेमुदत बंद करणार.५) बार असोसिएशनचे पदाधिकारी 30 तारखेला आपली सनद न्यायालयात परत करणार