शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
3
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
4
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
5
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
6
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
7
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
8
धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती
9
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
10
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
11
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
12
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
13
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
14
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
15
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
16
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
17
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
18
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
19
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
20
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

कोल्हापूर: मंजूर बील काढण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी; ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य अटकेत

By तानाजी पोवार | Published: September 29, 2022 7:08 PM

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकामाच्या मंजूर बीलापैकी उर्वरित रक्कम खात्यावर वर्ग करण्यासाठी मागितली लाच

कोल्हापूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकामाच्या मंजूर बीलापैकी उर्वरित रक्कम खात्यावर वर्ग करण्यासाठी लाच स्विकारताना कुर्डू (ता. करवीर) चे ग्रामविकास अधिकारी महादेव गणपती डोंगळे (वय ५६, रा. घोटवडे, ता. राधानगरी) व ग्रामपंचायत सदस्य धनाजी मारुती पाटील (वय ४७ रा. कुर्डू) यांना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, गुरुवारी दुपारी सापळा रचून लाचखोरांना पकडले. दोघांनी एकूण ३० हजाराची लाच घेताना कारवाई केली.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कुर्डू (ता. करवीर) गावात तक्रारदारास २, ९९,४३० रुपये सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम करवीर पंचायत समितीकडून मिळाले, बांधकामही पूर्ण केले. त्यापैकी त्यांना पंचायत समितीकडून २ लाख १० हजार व ग्रामपंचायतकडून ८९,४३७ रुपये मिळणार होते. त्यापैकी पंचायत समितीकडून १ लाख ९७ हजार रुपये तक्रारदारास मिळाले.उर्वरित ग्रामपंचायतीच्या रकमेसाठी तक्रारदाराने ग्रामविकास अधिकारी डोंगळे यांची भेट घेतली. डोंगळे यांनी, पंचायत समितीकडून पैसे मिळवून दिले व उर्वरित बीलाची रक्कम देण्यासाठी एकूण बिलाच्या दोन टक्के पैशाची मागणी केली. तर ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील याने उर्वरित बील मंजूरीसाठी एकूण बिलाच्या ८ टक्के पैशाची मागणी केली.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शरद पोरे, विकास माने, मयूर देसाई, रुपेश माने यांनी कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग