शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

सेंद्रिय शेतीच्या ‘सोनकेळीं’ना मागणी

By admin | Published: December 29, 2014 11:31 PM

बहुपिकांचा प्रयोग : दोन एकरांत प्रतिवर्षी तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न

आजरा तालुक्यातील पोळगाव येथील जयसिंग शामराव नार्वेकर या शेतकऱ्याने ‘सोनकेळीं’चे सेंद्रिय पद्धतीने पीक घेत एकरी तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली असून, सेंद्रिय केळींचे महत्त्व ओळखणाऱ्या मंडळींकडून या केळींना मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.जयसिंग नार्वेकर यांनी नवा प्रयोग म्हणून सोनकेळींचे उत्पादन घेण्याचे ठरविले. त्यासाठी कोकणातून त्यांनी १२०० मोने खरेदी केले. ६ बाय ८ ची सरी तयार करून त्यामध्ये त्यांची लावण केली. कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत अथवा कीटकनाशके न वापरता गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत यांचा वापर केला. गांडूळ खत निर्मितीसाठी स्वत:च्या शेतामध्ये एक युनिट उभे केले आहे. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करीत पाण्याचा पुरवठा केला आहे.सरींमध्ये कलिंगड, टोमॅटो यांचे आंतरपीक देखील घेतले, तसेच भाजीपालाही पिकविला आहे. बाहेरील कोणताही पगारी मजूर, कामगार न घेता पत्नी शांताबाई, वडील शामराव नार्वेकर व आई लक्ष्मी यांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध करून दिला. आंतरपीक म्हणून घेतलेल्या कलिंगड पिकातून त्यांना ८० हजार रुपये प्रतिवर्षी उत्पन्न अपेक्षित आहे. एकदा केळी लागवड केल्यानंतर साधारणपणे कमीत कमी तीन वर्षे नवीन फुटवे येऊन उत्पादन चालू राहते.प्रत्येक घडाला ८ ते १२ डझन केळी व या प्रकारच्या केळींचा बाजारातील सध्याचा दर प्रतिडझन ३० ते ४० रुपये इतका गृहित धरल्यास कमीत कमी तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न त्यांना प्रतिवर्षी मिळत आहे. सेंद्रिय पद्धतीने तयार झालेल्या या केळांना स्थानिक बाजारपेठेसह गडहिंग्लज, बेळगाव, कोकण येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. फळ पिकल्यानंतर किमान १५ दिवस खराब होत नाही, हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.- ज्योतिप्रसाद सावंत ल्ल आजराअनेकांना केले मार्गदर्शननार्वेकर यांचा सोनकेळी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाल्याने अनेकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस व अन्य पिकांऐवजी केळी पिकविण्यास सुरुवात केली आहे.