शाहूवाडी तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. पावसाळयात या मार्गावर मोठे अपघात होत असतात. नेहमी हा मार्ग रहदारीचा आहे. अवघड वाहनांची ये-जा सुरू असते. कोकणला जोडणारा एकमेव कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जुळेवाडी, वालुर गावच्या हद्दीतील मोऱ्यांची अवस्था बिकट आहे. दोन्ही मोऱ्या पावसाच्या पाण्याने खचल्या आहेत. दोन्ही बाजूकडील लोखंडी ग्रील तुटले आहेत. त्यामुळे रात्रीचे अपघात होत आहेत. दोन्ही मोऱ्या पन्नास फूट खोल आहेत. लोखंडी ग्रील तुटल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी लाकडी बांबू बांधले आहेत. केंद्र शासन वाहनधारकांकडून हजारो रुपयांचा कर गोळा करते. मग रस्ता व्यवस्थित ठेवणे, त्याची डागडुजी करणे त्यांचे कर्त्यव्य आहे.
खचलेल्या मोऱ्या दुरुस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:26 AM