गडहिंग्लज : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बरखास्त करून एस.टी. शासनातर्फेच चालविण्यात यावी, अशी मागणी गडहिंग्लज आगाराकडील एस. टी. कामगारांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वार केली.निवेदनात म्हटले आहे, एस. टी. महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून मासिक वेतनवाढदेखील वेळेवर होत नाही. महागाईमुळे त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळाचे शासनात विलगीकरण करून सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणीदेखील निवेदनातून करण्यात आली आहे.शिष्टमंडळात अमोल तांबेकर, संतोष भिंगले, विनोद शिंदे, महेश लोंढे, गणेश माने, अशोक बागडी, प्रमोद देसाई, चंद्रकांत आसबे, राजेंद्र पाटील, अल्लाबक्ष मुल्लाणी आदींचा समावेश होता.
एस.टी.शासनातर्फे चालविण्याची मागणी,कामगारमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2021 11:15 AM
State transport Kolhapur : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बरखास्त करून एस.टी. शासनातर्फेच चालविण्यात यावी, अशी मागणी गडहिंग्लज आगाराकडील एस. टी. कामगारांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वार केली.
ठळक मुद्देएस.टी.शासनातर्फे चालविण्याची मागणी,कामगारमंत्र्यांना साकडे गडहिंग्लज आगाराच्या कर्मचाऱ्यांचे निवेदन