शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

चंदगडमधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 11:59 PM

लोकमत न्यूज नेटवर्कचंदगड : चंदगड तालुक्यात बिनधास्तपणे मटका, जुगार सुरू आहेत. गोवा व गावठी दारूचा महापूर तालुक्यात सुरू आहे. या अवैध चालणाºया धंद्यावर तुमचाच अंकुश नाही. याचा त्रास मात्र सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. हे अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी पं. स. सदस्या रूपा खांडेकर यांनी पंचायत समितीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कचंदगड : चंदगड तालुक्यात बिनधास्तपणे मटका, जुगार सुरू आहेत. गोवा व गावठी दारूचा महापूर तालुक्यात सुरू आहे. या अवैध चालणाºया धंद्यावर तुमचाच अंकुश नाही. याचा त्रास मात्र सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. हे अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी पं. स. सदस्या रूपा खांडेकर यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत केली. अध्यक्षस्थानी सभापती जगन्नाथ हुलजी होते.गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.तालुक्यातील २०२ पैकी १०८ शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. ११ शिक्षक तालुक्यात हजर झाले तर ६२ पदे रिक्त असल्याची माहिती एस. बी. हालबागोळ यांनी दिली. बबनराव देसाई यांनी शिक्षक पदे रिक्त असताना आम्हाला हवी असलेली गुणवत्ता कशी काय मिळणार? यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी केली आहे.तडशिनहाळ येथील मराठी शाळेत ५ वर्ग व १ शिक्षक अशी स्थिती असल्याने या ठिकाणी तत्काळ शिक्षक द्या, अशी मागणी सदस्य विठाबाई मुरकुटे यांनी केली.मुरकुटेवाडी येथे दोन महिन्यापासून अपूर्णावस्थेत रस्ता आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे कामही अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडचण होत आहे. झाडे-झुडपे वाढली आहेत. बांधकाम विभागाकडून प्रत्येक मिटींगला तोच आढावा दिला जातो व आम्हालाही प्रत्येक मिटींगला हाच विषय मांडावा लागत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाकडून ही कामे होत नसतील तर सांगा आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो, असे सदस्य मनिषा शिवणगेकर यांनी सांगितले.पं. स. कृषी विभागाकडील गोदामाचा ताबा असलेला कर्मचारी गेले आठ दिवस गोदामाची चावी घेऊनच रजेवर आहे. सध्या भात, मूग, मका, पिकावर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी पं. स. कडे औषधे नेण्यासाठी फेºया मारत आहेत. मात्र, औषध देणारा कर्मचारीच रजेवर असल्याने शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत सभापती हुलजी यांनी ही बाब जिल्हा कृषी अधिकारी सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिली. सूर्यवंशी यांनी त्या कर्मचाºयांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश यावेळी खातेप्रमुखांना दिले. उपसभापती अ‍ॅड. अनंत कांबळे यांनी आभार मानले.सर्वांना शेततळे द्यामागेल त्याला शेततळे अशी जाहिरात शासन करीत आहेत. प्रत्यक्षात शेततळे मागायला गेलेल्या शेतकºयांना अनेक अटी सांगितल्या जातात. मग या योजनेमधून अनेक शेतकरी वंचित राहात आहेत.त्यामुळे या योजनेचे एकतर नाव बदला नाहीतर सर्वांना शेततळे द्या, अशी मागणी यावेळी सभापती जगन्नाथ हुलजी यांनी केली.