शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘आरटीई’ पात्र प्रवेशासाठी भरमसाट पैशांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:05 AM

कोल्हापूर : ‘आरटीई’अंतर्गत आरक्षित २५ टक्के शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत ड्रॉद्वारे पात्र ठरलेल्या बालकांच्या पालकांकडून शहरातील काही शिक्षणसंस्था ...

कोल्हापूर : ‘आरटीई’अंतर्गत आरक्षित २५ टक्के शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत ड्रॉद्वारे पात्र ठरलेल्या बालकांच्या पालकांकडून शहरातील काही शिक्षणसंस्था भरमसाट पैशांची मागणी करीत आहेत, त्याबाबतच्या तक्रारी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाकडे प्राप्त झाल्या आहेत. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकाराअंतर्गत आॅनलाईन लॉटरीच्या तीन फेऱ्यांतून जिल्ह्णातील सुमारे ३५००, तर शहरातून ५२५ पात्र बालकांना पहिलीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.शासनाच्या वतीने २०१२-१३ पासून बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम कायदा झाला; पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून झाली. आरटीई अंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश प्रक्रिया ही लकी ड्रॉद्वारे तीन फेऱ्यांत राबविण्यात येते. राखीव प्रवर्गासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्रत्येक खासगी शाळेतील २५ टक्के कोटा ‘आर. टी. ए.’साठी आरक्षित ठेवला जातो.कोल्हापूर शहरात पहिल्या फेरीतील प्रवेश अर्ज दि. ५ ते ३० मार्चपर्यंत आॅनलाईन पद्धतीने स्वीकारले, त्यांचा पहिला लकी ड्रॉ नुकताच झाला. त्यातील पात्र ३०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रवेशासाठी पत्रे देण्यात आली; पण ही पत्रे घेऊन पालक संबंधित शाळेत गेल्यानंतर काही शाळांच्या व्यवस्थापनाने प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ केली; तसेच शासनाकडून आम्हाला दोन-तीन वर्षांनी पैसे येतात, त्यामुळे आता तुम्ही १७ हजार ५०० रुपये स्कूल फी व ५००० रुपये शाळेची प्रवेश फी अशी एकूण २२ हजार ५०० रुपयांची मागणी पालकांकडे केली.संतप्त पालकांनी याबाबत महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळातील प्रशासनाधिकाºयांकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. या तक्रारी करण्यासाठी शनिवारी कार्यालयात गर्दी झाली होती. दुसºया फेरीतील ड्रॉ २ मे, तर तिसºया फेरीतील अखेरचा ड्रॉ १५ मेदरम्यान होणार आहे.