लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती विधेयक व कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, प्रत्येक जिल्ह्यात कुटुंब न्यायालये उभारावीत, अशी मागणी भारतीय महिला फेडरेशनने केली आहे. महिला दिनानिमित्त याबाबतचे निवेदन सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिलेल्या या निवेदनात कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळा विरोधी कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सनियंत्रणासाठी स्वतंत्र मनुष्यबळ सेवा सुविधा व निधीची तरतूद करावी, दलित , आदिवासी , भटके विमुक्त महिला तृतीयपंथी यांच्यावरील हिंसे संदर्भात विशेष दखल घेऊन मदत यंत्रणा उभी करावी आदी मागण्या करण्यात आल्या. संघटनेच्या अध्यक्षा सुनिता अमृतसागर,उमा पानसरे, सुमन पाटील, शुभांगी पाटील, पुनम सूर्यवंशी,निशा दाबाडे, पूजा केसरकर, लक्ष्मी शिंदे, मीना पवार, रेखा पाटील, छाया साठे, स्नेहल सांगलीकर, पद्मजा माने, सुरेखा मोरे, सुनंदा चौगुले उपस्थित होत्या.
---
फाेटो नं ०८०३२०२१-कोल-महिला फेडरेशन
ओळ : कोल्हापुरातील भारतीय महिला फेडरेशनच्यावतीने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना महिला सुरक्षेसाठी कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
---