१) ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, अनुदान द्यावे.
२) सारथी संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत.
३) अण्णासाहेब पाटील महामंडळातून राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा, सहकारी बँक, आदी वित्तीय संस्थांतून कर्जपुरवठा करावा.
४) पंजाबराव देशमुख वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करावी.
५) आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी जागा निर्माण कराव्यात.
६) मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी वसतिगृहांची उभारणी करावी.
७) राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी.
८) राज्य शासनाने जो नवीन राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे, त्यासंदर्भात मराठा समाजाचे काही प्रश्न आहेत. त्याबाबत सरकारने तत्काळ भूमिका जाहीर करावी.
९) मराठा आरक्षणासाठी कळीचा मुद्दा बनलेली संविधानात ५० टक्केची जी मर्यादा आहे, त्याबाबत लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका जाहीर करावी.
१०) शासनाने तत्काळ उच्च न्यायालयात स्पेशल बेंचच्या स्थापनेची मागणी करून कोपर्डीचा विषय तत्काळ निकाली लावावा.
११) काकासाहेब शिंदे यांच्यासह सर्वच आत्मबलिदान दिलेल्या मराठा कुटुंबीयांना मदत व त्यांच्या कुटुंबांतील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जावी.
आंदोलन झाले असे...
सकाळी नऊ वाजता : राज्यातील सर्व समन्वयकांचे आंदोलनस्थळी आगमन.
पावणे दहा वाजता : लोकप्रतिनिधी, समन्वयक, तारादूत, नोकर भरतीच्या प्रतीक्षेतील विद्यार्थी स्थानापन्न झाले.
दहा वाजता : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना खासदार संभाजीराजे आणि उपस्थितांनी अभिवादन केल्यानंतर आंदोलन सुरू.
दहा वाजून दहा मिनिटे : लोकप्रतिनिधींकडून भूमिका मांडण्यास सुरुवात.
दुपारी एक वाजता : राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता.
सव्वाएक वाजता : लॉंगमार्चबाबत चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे आणि समन्वयकांची बैठक.
अशी होती आंदोलनाची आचारसंहिता
या आंदोलनासाठी सकल मराठा समाजाने आचारसंहिता निश्चित केली होती. त्यानुसार काळ्या रंगाची कपडे परिधान करून दंडावर काळी फित बांधून आणि काळ्या रंगाचा मास्क घालून आंदोलक आले होते. छत्री, सॅॅनिटायझरही ते सोबत घेऊन आले होते.