गगनबावडा तालुक्यातील ७६ पैकी एका मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावला नाही.
सत्ताधारी राजर्षी शाहू पॅनेल विरोधी राजर्षी शाहू शेतकरी पॅनेलमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या. विरोधी पॅनेलने मतदारांना मतदानासाठी वेगवेगळ्या गाड्यांमधून आणले. यावेळी मोठ्या संख्येने मतदार आणून एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मतदार व समर्थक यांनी पिवळ्या रंगाचा मास्क व चिन्ह असलेल्या टोप्या घातल्या होत्या. त्याना मतदान केंद्र आवारात सोडताना चिन्ह असलेल्या टोप्या काढून घेण्यात आल्या. गगनबावडा येथे दोन्ही गटांकडून मतदान बूथ उभारण्यात आले होते. विरोधी गटाने मतदार याना दहानंतर मतदानासाठी आणले, तर सताधारी गटाचे ठरावधारक मतदार हेही मतदानासाठी एकत्र आले. गगनबावडा तालुक्यात एकूण ७६ ठरावधारक मतदार आहेत. या मतदानासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गगनबावडा तहसीलदार डाॅ. संगमेश कोडे यांनी मतदान केंद्राला भेट देऊन मतदानाची माहिती घेतली.