कोल्हापूर : महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या वतीने गुरुवारी डॉ. द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पिटल येथे अग्निशमन विभागाकडून शोध व बचावाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
यावेळी रुग्णालयात आपत्कालीन घटना घडल्यास कशा प्रकारे बचाव करावा, याबाबत रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, नागरिकांना प्रत्यक्ष घटना घडल्याचे भासवून वेगवेगळ्या आगी विझविण्याची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी वेगवेगळी पथके तयार करून घटना घडल्यास कोणी कोणत्या प्रकारे बचावाचे काम करावयाचे याचे मार्गदर्शन देण्यात आले.
सदर प्रात्यक्षिकाच्या वेळी आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश जाधव, डॉ. विजय मुसळे, डॉ. मनीषा चव्हाण, डॉ. शीतल वाडेकर, स्थानक अधिकारी मनीष रणभिसे, दस्तगीर मुल्ला, सुनील वाईंगडे, विशाल चौगुले, कांता बांदेकर, जयवंत खोत, प्रमोद मोरे, अभय कोळी, अग्निशमन जवान तसेच डॉ. द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पिटलचे इतर विभागांचे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
- फोटो क्रमांक - ०४०२२०२१-केएमसी फायर -
ओळ - कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या वतीने गुरुवारी डॉ. द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पिटल येथे गुरुवारी एखादी दुर्घटना घडल्यास कशा प्रकारे बचावकार्य करावे, याबाबतचे स्थानक अधिकारी मनीष रणभिसे यांनी मार्गदर्शन केले.