कोल्हापूर : ई.पी.एस.९५ च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनवाढ करुन ती किमान ९००० रुपये करावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी कोल्हापूर पेन्शनर संघटनेतर्फे ताराबाई पार्क मधील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी पाच डिसेंबरला दिल्ली येथे संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही निवृत्त कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला.ई.पी.एस.९५ राष्ट्रीय समन्वय समितीतर्फे दिल्ली येथील प्रधान कार्यालयावर व देशभरातील क्षेत्रीय कार्यालयावर गुरुवारी मोर्चा, निदर्शने करुन निवेदन देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पेन्शनर संघटनेच्या वतीने भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्हा पेन्शनर संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.पेन्शनवाढीसाठी न्यायालयाने निर्णय देवून देखील सरकारकडून न्याय मिळत नसेल आत्मदहन करू जतंर मंतर वर तीव्र आंदोलन उभा करूया, पेन्शनवाढ होत नाही तो पर्यन्त माघार घेवू नये खासदारांच्या दारात सवाद्याच्या गजर करून आंदोलन करावे, योग्य व अहिंसा मागार्ने आंदोलन चालू ठेवून सरकारला जागे करुया अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. ५ डिसेबरला जंतर मंतरवर आंदोलन होणार असून त्याच दिवशी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे यामध्ये पेन्शनरानी मोठया संखेने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.यानंतर अध्यक्ष शामराव मोरे, सचिव ए.बी. पाटील, संघटक सुभाष गुरव, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य शिवाजी देसावळे, शिवाजी सावंत, समन्वयक दिलीप पाटील,ए.सी.दांडेकर, बिद्री साखर कामगार सभेचे अध्यक्ष आनंदराव आबीटकर यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त सौरभ प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसर सर्वांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळाला पाहिजे,किमान पेंशन रु ९००० मिळाली पाहिजे,केंद्र व राज्य सरकारच्या पेन्शनर्स प्रमाणे आपल्याला सुद्धा दर सहा महिन्याला महागाई भत्ता मिळाला पाहिजे, ईपीएस ९५ च्या पेन्शनर्सना वैद्यकीय सुविधा विनामुल्य मिळाल्या पाहिजेत, वेटेज पेन्शनचा सरसकट लाभ मिळाला पाहिजे असे निवेदनात म्हंटले आहे.आंदोलनात आर.के. पाटील, शंकर चौगुले, दिपक चव्हाण, शामराव मोळे, सुभाष डुबल, एन.टी. धनवडे, सुरेश जांगुले, रामचंद्र झेपले, काशीनाथ गोरूले, महेद्र विंचू,रावसाहेब मोहिते यांच्यासह पेन्शनर सहभागी झाले होते.
निवृत्त कर्मचाऱ्यांना ९०००पेन्शनसाठी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 4:44 PM
ई.पी.एस.९५ च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनवाढ करुन ती किमान ९००० रुपये करावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी कोल्हापूर पेन्शनर संघटनेतर्फे ताराबाई पार्क मधील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी पाच डिसेंबरला दिल्ली येथे संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही निवृत्त कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला.
ठळक मुद्देनिवृत्त कर्मचाऱ्यांना ९०००पेन्शनसाठी निदर्शनेपाच डिसेंबरला दिल्लीत संसदेवर मोर्चाचा इशारा