शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ४९ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:22 PM

डेंग्यूला प्रतिबंध करण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाची जनजागृती सुरू असतानाही नागरिक योग्य प्रकारे खबरदारी घेत नसल्याचे डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहिमेतून स्पष्ट होत आहे. गुरुवारी केलेल्या मोहिमेत ४१६ घरांपैकी ४९ ठिकाणी पाण्याच्या कंटेनरमधून डेंग्यूच्या अळ्या आढळून आलेल्या आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ४९ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्याडेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबविण्याकरिता आदेश

कोल्हापूर : डेंग्यूला प्रतिबंध करण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाची जनजागृती सुरू असतानाही नागरिक योग्य प्रकारे खबरदारी घेत नसल्याचे डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहिमेतून स्पष्ट होत आहे. गुरुवारी केलेल्या मोहिमेत ४१६ घरांपैकी ४९ ठिकाणी पाण्याच्या कंटेनरमधून डेंग्यूच्या अळ्या आढळून आलेल्या आहेत.महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबविण्याकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आदेश दिले आहेत. या आदेशास अनुसरून गुरुवारी शहरातील शाहूपुरी सहावी गल्ली, सुतारवाडा परिसर, न्यू शाहूपुरी पर्ल हॉटेलच्या मागे, कनाननगर परिसर, बालेकिल्ला परिसर, मोरे कॉलनी, दत्त चिलेनगर, तपोवन परिसर, इत्यादी ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य, नागरी कुटुंबकल्याण केंद्र (दवाखाना) तसेच जिल्हा हिवताप विभाग यांच्यामार्फत संयुक्तपणे डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबविण्यात आली. सदरच्या मोहिमेअंतर्गत ४१६ कुटुंबे व ९०९ कंटेनरचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांपैकी ४९ कंटेनरमध्ये डासअळ्या आढळून आलेल्या आहेत.सदरच्या मोहिमेत आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आरोग्य विभागाचे २३ कर्मचारी, नागरी कुटुंब कल्याण केंद्र व जिल्हा हिवताप विभागाचे १६ अधिकारी, कर्मचारी, सर्व आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक, आदींनी भाग घेतला.गेल्या वर्षापासून शहराच्या हद्दीत डेंग्यूचा प्रादुर्भाव निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत महापालिकेतर्फे जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या तीन विभागांचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहितीपत्रके वाटण्याबरोबरच घरातील पाण्याचे कंटेनर तपासत आहेत. नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याची बाब या मोहिमेतून पुढे आली आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूkolhapurकोल्हापूर