शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढल्याने रक्ताची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:53 AM

BloodBank Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आणि नियमित शस्त्रक्रियांचे रुग्ण वाढल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देडेंग्यू, मलेरियाने डोके वर काढल्याने रक्ताची गरज नियमित शस्त्रक्रियांचे रुग्ण वाढले : रक्तदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन

कोल्हापूर : जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आणि नियमित शस्त्रक्रियांचे रुग्ण वाढल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नियोजित शस्त्रक्रिया प्रलंबित राहिल्या होत्या. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये गर्दी होत आहे. कॅन्सर, हाडाचे आजार, प्रसूती, अपघातामुळे रुग्ण वाढले असून आता हॉस्पिटलमधून रक्ताची मागणी होऊ लागली आहे. त्यात कोरोनामुळे रक्तदात्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने सध्या सगळीकडे रक्ताची टंचाई भासत आहे. यासाठी आता रक्तदानाची गरज असून रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.कधी रक्तदान करावे

  • कोरोना प्रतिबंध लसीकरणानंतर चौदा दिवसांनंतर
  • कोरोनातून बरे झाल्यानंतर २८ दिवसांनी
  • पुरुषांनी दर तीन महिन्याला
  • महिलांनी दर चार महिन्याला 

शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि रक्तदानमानवी शरीरात (१८ ते ६५ वयोगटातील व ४५ किलोपेक्षा अधिक वजन) ५ ते ६ लिटर रक्त असते. त्यातील ५ टक्के म्हणजेच ३५० ते ४५० मिली रक्त एका वेळी घेतले आहे.महिलांचे रक्तदानाचे प्रमाण ७ टक्केरक्तदानाची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर देशात ७ टक्केच महिला रक्तदान करतात. रक्तदानाची मानसिकता असते. मात्र, फास्ट फूडचे सेवन, सकस आहार व व्यायामाचा अभाव, अनियमित मासिक पाळीमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण खूप कमी असते.जिल्ह्यात २५० थॅलेस्मियाचे रुग्णथॅलेस्मिया, डायलेसिस रुग्णांना महिन्याला रक्त द्यावे लागते. जिल्ह्यात २५० हून अधिक ह्यथॅलेस्मियाह्णचे रुग्ण असल्याने त्यांना मोफत रक्तपुरवठा करावा लागतो.जून महिन्यात एक हजार प्लेटलेटची मागणीयंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने सुरुवात केली होती. त्यात ऊन-पावसामुळे डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले. जून महिन्यात जिल्ह्यात एक हजार प्लेटलेटची मागणी विविध रक्तपेढ्यांतून झाली.

लोकमतने नेहमीच सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रम राबवले. सध्या रक्ताची टंचाई ओळखून राज्यभर रक्तदानाची मोहीम राबवण्याचा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.- प्रकाश घुंगूरकर ,अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशन

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीkolhapurकोल्हापूर