शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

डेंग्यूचा डंख घातक, लागलीच चाचणी करून घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 4:09 AM

कोल्हापूर : अतिवृष्टी, महापूर यामुळे शहरात सर्वत्र चिखल साचून दुर्गंधी पसरली आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी साचून डबकी तयार झाली ...

कोल्हापूर : अतिवृष्टी, महापूर यामुळे शहरात सर्वत्र चिखल साचून दुर्गंधी पसरली आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी साचून डबकी तयार झाली आहेत. डासाचे साम्राज्य वाढून डेंग्यूचा धोका वाढला आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया यासारखे आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने अंगात साधा ताप जरी असला तरी तो अंगावर काढणे, दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

गेल्या दीड वर्षापासून शहरवासीयांचे आरोग्य बिघडलेले आहे. कोरोनाने नागरिकांना हैराण केले. त्याचा मुकाबला करता करता नाकीदम आला असताना आता परत अतिवृष्टी, महापुराने आजार आणले आहेत.गॅस्ट्रो, पोटाचे विकास, डेंग्यू, चिकुनगुनिया, यासारखे गंभीर आजारही सतावत आहेत. कोल्हापूर शहरात चिकुनगुनिया, डेंग्यूचे रोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांकडे असे रुग्ण उपचारासाठी येत असल्याने रुग्णांचा आकडा मोठा आहे.

सर्वेक्षण थांबले-

कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच अतिवृष्टी व महापूर आला. त्यामुळे गेल्या आठ-दहा दिवस महापालिका यंत्रणात त्यात व्यस्त होती. पूर ओसरल्यानंतर आराेग्य सविधा देण्यात यंत्रणा गुंतली आहे. त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनियाचे सर्वेक्षणच थांबले आहे. त्यामुळे शहरात किती रुग्ण आहेत याचा नेमका अंदाज नाही.

सांधेदुखी, ताप व थंडी वाजून येते-

डेंग्यू व चिकुनगुनियामुळे मनगट, घोटा, गुडगा, खांदे अशा सांध्यांमध्ये खूप वेदना होतात. ताप येतो. थंडी वाजून येते. तांबड्या व पांढऱ्या पेशी कमी होतात. प्लेटलेट कमी झाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे उचित ठरते.

- डासांपासून सावध रहा -

अतिवृष्टीमुळे घराच्या परिसरात चिखल, सांडपाणी साचलेले आहे. टायर्स, नारळाची बेल्टी यामध्ये पाणी साचून पाणी साचत आहे. परिसर अद्याप स्वच्छ व कोरडा झालेला नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात आळी घालतात. त्यामुळे घरातील फ्रीज, कुंड्या, प्लेट यातील साचणाऱ्या पाणीची विल्हेवाट लावली पाहिजे. डास होणार नाहीत, चावणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे.

- कोणती चाचणी करून घ्यावी-

डेग्यू व चिकुनगुनिया झाला आहे का हे पाहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने सीबीसी, युरिन, ब्लड फॉर मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया या चाचणी करुन घेणे हिताचे ठरते. काही अपवादात्मक परिस्थितीत अँटिजेन टेस्टसुध्दा करावी. कारण कोरोना संसर्गसुध्दा झालेला असू शकतो.

- ही फळे भरपूर खा -

शरीरातील प्लेटलेटस् कमी झाली असल्याचे तपासणी अंती लक्षात येताच वैद्यकीय उपचाराबरोबरच किवी, ड्रॅगन, पपई, डाळिंब अशी फळे भरपूर खाल्ली पाहिजेत. प्लेटलेटस् वाढण्यात ही फळे महत्त्वाची भूमिका बजावतात.

डॉक्टर कोट -

डेग्यू व चिकुनगुनियाची लक्षणे असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला डोळा, नाक, कान, तोंड अशा जिथे भोक आहे त्याठिकाणाहून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याआधी योग्यवेळी योग्य तपासण्या करून घेणे रुग्णाच्या हिताचे ठरते.

डॉ. विलास महाजन

माजी अध्यक्ष, जनरल प्रॅक्टिशनर्स असो.