कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यापासून कोल्हापूर शहरातील डेंग्युची साथ वाढत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी शहरातील विविध भागातील १३ डेंग्युसदृश्य रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.दरम्यान,मंगळवार पेठ परिसरात सर्वोधिक डेंग्यु सदृश्य रुग्ण असून साधारणत : सहा ते १५ वयोगटातील मुलांना डेंग्युची लागण झाल्याने या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे, गेले दोन महिने जवाहरनगर परिसरातील जमादार कॉलनी, सरनाईक कॉलनी आदी कॉलन्यामधील डेंग्यु सदृश रुग्णाचे प्रमाण कमी आले आहे.कोल्हापूर परिसरात विशेषत : उपनगरात डेंग्युची लागण झाल्याचे रुग्ण होते. ती आता शहरात पसरु लागली आहे. मे, जुन व जुलै या तीन महिन्यात डेंग्यु सदृश्य रुग्णांची संख्या वाढली आहे. मे मध्ये ३१,जुनमध्ये २९१ तर या सहा दिवसात ८३ रुग्ण आहेत.
शुक्रवारी फुलेवाडी,सदरबझार,राजेंद्रनगरसह मंगळवार पेठ परिसरात १३ डेंग्यु सदृश्य रुग्ण आहेत.दरम्यान, मंगळवार पेठेतील म्हादू गवंडी तालीम गल्ली,सनगर गल्ली या ठिकाणी सहा ते १५ वयोगटातील मुलांना डेंग्युची लागण झाल्याचे नागरिकांनी सांगितले.शहरात ज्या ठिकाणी डेंग्यु सदृश्य रुग्णांची संख्या जास्त आहे,त्याठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषध फवारणी,सर्व्हे केला आहे.