शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

विभागात कृषिपंपांची ७४७ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 1:13 AM

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वीज बिले भरण्यास शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याने कृषिपंपांच्या थकबाकीचा आकडा वाढत ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वीज बिले भरण्यास शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याने कृषिपंपांच्या थकबाकीचा आकडा वाढत चालला आहे. सद्य:स्थितीत राज्यात २५ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यात कोल्हापूर विभागाचा वाटा ७४७ कोटींवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरात या थकबाकीत १२५ कोटी रुपयांची भर पडली आहे. कोल्हापूर, सांगलीसारख्या सधन जिल्ह्यांनी बिले भरण्यास टाळाटाळ केल्याने ‘महावितरण’च्या कारभाराचा डोलारा सांभाळायचा कसा, असा प्रश्न उभा ठाकला आहे.सध्या पाणी व कोळशाच्या अपुºया पुरवठ्यामुळे वीजनिर्मिती घटल्याने राज्यात २५00 मेगावॅटचा तुटवडा आहे. परिणामी राज्यभरात भारनियमन सुरू असून शेतीपंपासाठीच्या पुरवठ्यातही दोन तासांनी कपात केली आहे. शेतीपंपाची थकबाकी वसूल होत नसल्यानेही त्यांच्या पुरवठ्यात कपात केली जात आहे. आॅगस्टअखेर कोल्हापूर विभागात ६२३ कोटींची थकबाकी होती. आतापर्यंत ती ७४७ कोटींवर गेली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यांची १६४, तर सांगलीची ५८२ कोटी इतकी थकबाकी झाली आहे.इतर जिल्ह्यांपेक्षा ही थकबाकी कमी असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे. सोलापूर, नगर, लातूर, नाशिक, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांत प्रत्येकी हजार ते १५०० कोटींच्या वर थकबाकी असून वसुली होत नसल्याने त्याचा सेवेस फटका बसत आहे. कृषी संजीवनी योजनेसारखी सवलत पुन्हा लागू होईल, या अपेक्षेने बिले भरण्याकडे कानाडोळा होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.वसुलीला ब्रेक‘महावितरण’ने वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली, पण ही कनेक्शन तोडू नयेत, असे आदेश राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी काढले आहेत. ट्रान्स्फॉर्मर जळाला तर २५ हजारांच्या आत थकबाकी असणाºयांना तीन हजार, तर त्यावरील थकबाकी असणाºयांकडून पाच हजार रुपये भरून ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करून वीजजोडणी पूर्ववत करण्याचेही आदेशात म्हटले आहे. यानंतर वसुली थांबली असून, विभागात एप्रिलपासून केवळ नऊ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत.जिल्हा कृषिपंप थकबाकीकोल्हापूर १ लाख ४३ हजार २६१ १६४ कोटीसांगली २ लाख २५ हजार ८६४ ५८२ कोटी