प्रास्ताविकात एम. टी. पोवार म्हणाले, हनुमान दूध संस्था ही गावातील एक अग्रगण्य संस्था असून संस्थेने यापूर्वी येथील दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध बोनस वाटप केले आहे. ही परंपरा याही वर्षी कायम ठेवून संस्थेने सतत सभासद व दूध उत्पादक केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्याचे काम केले आहे.
कार्यक्रमास उपसरपंच शरद पाटील, व्हा. चेअरमन पांडुरंग कांबळे, संचालक विश्वास पाटील, श्रीपती वाडकर, दीपक हातकर, सुरेश मर्दाने, पांडुरंग पाटील, बाळासो निचिते, गोविंद पालकर, बाजीराव वाडकर, सुनील बल्लाळ, इंदूबाई पालकर, पांडुरंग कांबळे, दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.
स्वागत संचालक हिंदुराव जाधव यांनी केले तर आभार के. बी. वाडकर यांनी मानले.
फोटो ओळी : व्हनाळी येथे हनुमान दूध संस्थेमार्फत उत्पादकांना ठेव रकमेचे वाटप करताना संचालिका अंजना बल्लाळ, शेजारी चेअरमन एम. टी. पोवार आदी. (छायाचित्र : जगदीश वाडकर)