शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

शरद पवार यांच्या दौऱ्याने भाजप अस्वस्थ, देवेंद्र फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 1:12 PM

रणनीतीकडे कार्यकर्त्यांचा नजरा

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजप जिल्हाध्यक्षांची तातडीची बैठक आज मंगळवारी दुपारी ४ वाजता मुंबईत बोलावली आहे. ज्या पद्धतीने शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडवून देण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळेच ही बैठक होत असून, यामध्ये होणाऱ्या विचारमंथनाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.सध्या पश्चिम महाराष्ट्रात पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतशरद पवार यांनी दौरे करत महायुतीमधून संधी न मिळणाऱ्यांना आपल्या गोटात सामील करून घेण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक वैर विसरून पवार यांनी लोकसभेप्रमाणेच गाठीभेटींचे सत्र सुरूच ठेवल्याने सत्तारूढांच्या पोटात गोळा आला आहे. गेल्या विधानसभेला सोलापूर जिल्ह्याने भाजपला चांगला हात दिला होता. परंतु, यंदा तेथील परिस्थिती बदलली आहे. या सगळ्यामुळे भाजप कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत.समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील, चंदगडचे शिवाजी पाटील हे नेते उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले गेले. त्यांच्या राजकारणाला फडणवीस यांनी सातत्याने सत्तेचे बळ दिले. परंतु, तरीही फडणवीस यांनी दिलेली ऑफर डावलून समरजित यांच्यापाठोपाठ हर्षवर्धन पाटीलही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात गेले आहेत. रामराजे निंबाळकर यांच्याही तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवाजी पाटील यांच्याशीही राष्ट्रवादीने संपर्क साधला आहे.आपण मैदानात उतरण्यासाठी तयार केलेली माणसे अशी हातातून सुटत असल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. भाजपची सत्ता असताना २०१९ च्या अगोदर दोन्ही काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्यासाठी अशीच रीघ लागली होती. या दोन पक्षांत कोण राहतंय की नाही अशी हवा तेव्हा तयार झाली होती.

अशातच कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यात महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. कोल्हापुरात तर नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी भाजपच्या वाट्याला असलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघावर हक्क सांगून वातावरण तापवले आहे. या पार्श्वभूमीवर या पाच जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस आणि प्रदेश सदस्यांची ही ‘सागर’ बंगल्यावर बैठक होत आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्यात येणार असून, भाजपसोबतच युतीच्या उमेदवारांबाबतही चर्चा होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाSharad Pawarशरद पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस